मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (फोटो- सोशल मिडिया)
IPL 2025: सध्या आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू आहे. दरम्यान आज संध्याकाळी मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात महामुकाबला होणार आहे. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे. तर लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करणार आहे. दोन्ही संघाचा या हंगामातील 4 था सामना असणार आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. हा सामना कुठे होणार आहे दोन्ही संघात कोण कोण खेळणार हे जाणून घेऊयात.
लखनौ सुपर जायंट्सने आपल्या स्पर्धेची सुरुवात पराभवाने केली. त्यानंतरच सामना जिंकला आहे आणि मागील सामन्यात त्यांनी पराभव स्वीकारला. तर मुंबई इंडियन्सने पहिले दोन्ही सामने गमावले होते. मागील सामन्यात त्यांनी कोलकाता नाइट रायडर्सचा दणदणीत पराभव केला आहे. त्यामुळे मुंबईचा आजचा सामना देखील खेळण्यासाठी विजयाचा आनंद घेऊन उतरणार आहे. तर लखनौ सुपर जायंट्सचा संघ विजयाच्या दृष्टीने खेळताना पाहायला मिळेल.
पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा यंदाच्या स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्माचा खराब फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. तर लखनौच्या संघाची सुरुवात देखील फारशी चांगली झाली नाहीये. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. आजचा सामना लखनौच्या होम ग्राउंडवर होणार आहे. भारतरत्न अटळ बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये आजचा सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल.
आजचा सामना कुठे पाहता येईल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलसवर पाहायला मिळतील. तर लाईव्ह सामना जिओहॉटस्टारवर देखील पाहायला मिळतील.
मुंबई इंडियन्सचा संघ – रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स/मुजीब उर रहमान, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार
लखनौ सुपर जायंट्सचा संघ – मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, दिग्वेश सिंग राठी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, रवी बिश्नोई
सनरायझर्स हैदराबादची पराभवाची हॅट्ट्रिक
कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आयपीएल २०२५ चा १५ वा सामना पार पडला. या सामन्यांमध्ये पुन्हा एकदा कोलकत्ता नाईट रायडर्सने या स्पर्धेत दुसरा विजय नावावर केला आहे. सनरायझर्स हैदराबादला या स्पर्धेमध्ये शिल्लक तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाने हैदराबादला ८० धावांनी पराभूत केले. या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाला ईडन गार्डनच्या मैदानावर १२० धावांवर सम्पूर्ण संघाला बाद केले आणि हा हैदराबादचा आयपीएल २०२५ मध्ये सर्वात मोठा पराभव आहे.