फोटो सौजन्य - BLACKCAPS सोशल मिडीया
South africa vs New Zealand : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. तर दुसरा समीकरणांमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ भिडले या दोन्ही संघांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने दमदार कामगिरी करत लाहोरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आहे. कालच्या सामन्यांमध्ये लाहोरच्या मैदानावर किवी संघाने ३६२ सर्वाधिक धावा ठोकून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. यामध्ये न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज रचिन रवींद्र याने शतक ठोकले त्याचबरोबर त्याच्या मागोमाग केन विलियम्सन यांनी सुद्धा शतक ठोकून मोठी धावसंख्या उभी करण्यात यशस्वी झाले.
आता आयसीसीला चॅम्पियन ट्रॉफीचे अंतिम सामन्याचे दोन्ही संघ मिळाले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा भारत आणि न्यूझीलंड एकमेकांसमोर येणार आहेत. भारताच्या संघाने झालेली सामन्यामध्ये न्यूझीलंडचा दुबई मैदानावर पराभव केला होता. न्यूझीलंडचा सलामीवीर युवा फलंदाज रचिन रविंद्रला चॅम्पियन ट्रॉफी आधी सराव सामन्यात गंभीर दुखापत झाली होती, त्याला चालू सामन्यात मैदान सोडावे लागले होते. त्यांनंतर तो पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात खेळू शकला नाही त्यानंतर रचिनने बांग्लादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात पुनरागमन केले होते आणि चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकले. सध्या तो दमदार फॉर्ममध्ये आहे. आता त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देखील कमालीची कामगिरी करून १०५ धावा करून चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दुसरे शतक ठोकले आहे. रचिन रवींद्र हा सर्वात कमी २८ सामन्यांमध्ये पाच शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यामध्ये डेव्हन कॉन्वे हा पहिला फलंदाज आहे कॉन्वेने संघासाठी २२ सामन्यांमध्ये ५ शतक केले आहेत.
चॅम्पियन ट्रॉफी २०२५ आता शेवटच्या टप्प्यात आहे, पहिल्या उपांत्य फेरीमध्ये विजय मिळवून भारताच्या संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता तर आता दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीमध्ये टीम इंडियाशी सामना करणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर किवी संघाचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये न्यूझीलंडचा संघाने पहिला विकेट लवकर गमावला. किवी संघाचा पहिला विकेट आठव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर गेला. विल यंग याने संघासाठी संघासाठी २१ धावा केल्या. त्यानंतर संघाचा ३३.५ व्या चेंडूवर दुसरा विकेट केला तो परत किवी संघाने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. यामध्ये रचिन रवींद्रने १०५ धावांची खेळी खेळली, तर केन विलियम्सनने १०२ धावा केल्या. डेव्हिड मिचेलने संघांसाठी ४९ धावांची महत्वाची खेळी खेळली. ग्लेन फिलिप्सने संघासाठी ४९ धावांची कमालीची खेळी खेळली आहे.