NCB ची मोठी कारवाई! नेपाळ-भारत-श्रीलंका ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १० कोटींचा मुद्देमाल हस्तगत (Photo Credit - X)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नशामुक्त भारत’ मोहिमेअंतर्गत आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एनसीबीच्या चेन्नई झोनल युनिटने हैदराबाद युनिटच्या सहकार्याने ही समन्वयित मोहीम राबवली. तस्करांकडून दोन कार, एक मोटारसायकल आणि तस्करीसाठी वापरण्यात येणारी एक मासेमारी नौका जप्त करण्यात आली आहे.
NCB busts international drug trafficking network operating across 3 countries. Drugs worth Rs 10 crore seized. It was sourced from Nepal smuggled across States in India to Sri Lanka Car bikes boat seized @narcoticsbureau @R_Sudhakar_Ips https://t.co/hB8EZ887E4 — Vijay Kumar S (@vijaythehindu) March 6, 2026
गुप्त माहितीच्या आधारे ३ मार्च २०२६ रोजी एनसीबी हैदराबादच्या पथकाने तेलंगणातील बेंगळुरू-हैदराबाद महामार्गावरील रॅकल टोल प्लाझाजवळ एक टाटा सफारी कार अडवली. या कारमध्ये विशेष कप्पे तयार करून २ किलो चरस लपवण्यात आले होते. या प्रकरणी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत असे समोर आले की, हा साठा नेपाळमधील काठमांडू येथून सोनौली सीमेद्वारे भारतात आणला गेला होता.
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की, ७८ किलो हॅशिश ऑइलचा मोठा साठा तामिळनाडूतील तुतीकोरीन येथे आधीच पोहोचवण्यात आला होता. तेथून समुद्रमार्गे हा साठा श्रीलंकेला पाठवण्याची तस्करांची योजना होती. एनसीबी चेन्नईच्या पथकाने तातडीने कारवाई करत तुतीकोरीनमधून तीन जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून ७८ किलो हॅशिश ऑइल जप्त केले.
तस्कर तुतीकोरीन किनारपट्टीजवळ ‘मिड-सी ट्रान्सफर’ (समुद्राच्या मध्यभागी मालाची अदलाबदल) तंत्राचा वापर करून हा साठा श्रीलंकेतील रिसीव्हरला देणार होते. यासाठी मासेमारी नौकेचा वापर केला जाणार होता. मात्र, भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने एनसीबीने आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ ही संशयास्पद नौका अडवून जप्त केली आणि तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला.
या संपूर्ण नेटवर्कचा मास्टरमाइंड श्रीलंकेत बसलेला एक श्रीलंकन नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानेच नेपाळपासून श्रीलंकेपर्यंत ड्रग्ज पोहोचवण्यासाठी आर्थिक रसद आणि तांत्रिक समन्वय साधला होता. एनसीबी आता या आंतरराष्ट्रीय टोळीच्या इतर सदस्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहे.
या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एनसीबी चेन्नईने अमली पदार्थांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे:
तसेच, या वर्षात जुन्या तीन प्रकरणांमधील आठ आरोपींना न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे.






