फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मिडिया
England and Nepal Toss Update : इंग्लंड आणि नेपाळ आजपासून टी-२० विश्वचषक २०२६ च्या मोहिमेला सुरुवात करत आहेत. २०२६ च्या टी२० विश्वचषकातील पाचव्या सामन्यात इंग्लंड आणि नेपाळ एकमेकांसमोर येतील. हा त्यांचा स्पर्धेतील पहिला सामना आहे. टी-२० विश्वचषकाच्या १० व्या हंगामातील पाचवा सामना आज इंग्लंड आणि नेपाळ यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी या स्पर्धेतील हा पहिलाच सामना आहे. या सामन्याचे नाणेफेक पार पडले.
इग्लंड विरूद्ध नेपाळ यांच्यामध्ये नाणेफेक पार पडले या सामन्यामध्ये इंग्लडचा कर्णधार हॅरी ब्रुक याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जर इंग्लंडने वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी केली तर नेपाळच्या गोलंदाजीचा पराभव होण्याची शक्यता आहे. २५० धावांचा स्कोअर झाला तरी आश्चर्य वाटणार नाही, कारण नेपाळचा संघ खूपच कमकुवत संघ आहे.
इंग्लंडचा संघ विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. कागदावर, नेपाळविरुद्ध इंग्लंड हा एक मजबूत दावेदार दिसतो. श्रीलंकेविरुद्धच्या अलिकडच्या टी-२० मालिकेत संघाची कामगिरी प्रभावी होती. दुसरीकडे, नेपाळ देखील या सामन्यात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंड आणि नेपाळ यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तसेच तुम्ही JioHotstar वर या सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील पाहू शकता.
England have won the toss & they will bat first at Wankhede, Mumbai! ICC Men’s #T20WorldCup | #ENGvNEP | LIVE NOW 👉 https://t.co/dABzR5eM25 pic.twitter.com/OBOuMnOAh5 — Star Sports (@StarSportsIndia) February 8, 2026
इंग्लडची पहिल्या सामन्यात प्लेइंग 11: फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेट कीपर), जैकब बेथेल, टॉम बैंटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जैक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, ल्यूक वुड
नेपाळची पहिल्या सामन्यात प्लेइंग 11: कुशाल भुर्टेल, आसिफ शेख (विकेट कीपर), रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंह ऐरी, आरिफ शेख, लोकेश बाम, गुलसन झा, करण केसी, नंदन यादव, संदीप लामिछाने, शेर मल्ला






