Hajj ला जाताय? यात्रेपूर्वी करुन घ्या हेल्थ चेक-अप; पालिकेच्या दोन रुग्णालयांत विशेष सोय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मुंबई आणि उपनगरातून सुमारे चार हजार यात्रेकरू हजसाठी जाणार असल्याने राज्य हज समिती आणि महापालिका प्रशासनात याबाबत चर्चा होऊन कूपर रुग्णालय आणि बालासाहेच ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर या दोन रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ३०० यात्रेकरूंच्या तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेकरूंना १५० जणांच्या गटात विभागून तपासणी व लसीकरण प्रक्रिया राबवली जाणार असून, प्रत्येक गटासाठी प्रशिक्षक नेमण्यात आला आहे.
यात्रेकरूंनी तपासणीसाठी स्वतःची वैद्यकीय नौद तसेच ताजे अहवाल सोबत आणणे आवश्यक असून यात रक्तातील साखर तपासणी, मूत्रपिंड कार्य तपासणी, यकृत कार्य तपासणी, एक्स-रे, ईसीजी, महिलासाठी गर्भधारणा तपासणी आणि गर्भवती असल्यास सोनोग्राफी यांचा समावेश आहे, प्राथमिक अहवालात काही त्रुटी आढळल्यास अतिरिक्त तपासण्या महापालिकेच्या केंद्रांत करण्यात येतील.
लसीकरणाबाबत कळविण्यात आले की, सर्व ‘फिट’ यात्रेकरूंना क्यूएमएमकी लस देण्यात येईल, ६५ वर्षांवरील यात्रेकरूना एसआयव्ही लस दिली जाणार असून, ओपीव्ही लस देण्यात येणार नाही, कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र आरोग्य कार्डावर नमूद करणे बंधनकारक आहे. आरोग्य कार्ड भरण्याची जबाबदारी हज समितीच्या प्रशिक्षकांकडे राहाणार असून, त्याच माहितीची नोंद आरोग्य पोर्लटवर करण्यात येणार आहे.
याशिवाय सौदी अरेबियाने हजा यात्रेसाठी आणखी एक नवा नियम लागी केला आहे. गेल्या काही काळात या यात्रेसाठी प्रचंड गर्दी वाढत आहे. यामुळे वाढती गर्दी टाळण्यासाठी आणि अवैध घुसखोरी रोखण्यासाठी सौदी सरकारने नवे डिजिटल कार्ड लॉन्च केले आहे. या कार्डमुळे हज यात्रेकरुंचा प्रवास अधिक सुखाचा होईल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय यात्रेकरुंची एक डिजिटल ओळख तयार केली जाणार असून यासाठी एक Nusuk Card तयार करण्यात आले आहे.
दरवर्षी सौदी अरेबियामध्ये मक्का आणि मदिना येथे हज तीर्थ यात्रेचे आयोजन केले जाते. ही यात्रा जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक हज स्तंभ आहे. या यात्रेसाठी जगभरातून मोठ्या संख्येने लोक येतात.






