NZ vs PAK : न्यूझीलंडचा एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश!(फोटो-सोशल मीडिया)
NZ vs PAK : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात नुकतीच एकदिवसीय मालिका पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानवर 43 धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने वनडे मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश संपादन केले. न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला आहे. या मालिकेपूर्वी न्यूझीलंडने पाकिस्तानला टी-20 मालिकेत 4-1 ने नमवले होते.
पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानला 13 धावांवर पहिले यश मिळाले. निक केली 3 धावा करून माघारी परतला झाला. यानंतर राइस मारियु आणि हेन्री निकोल्स यांनी 78 धावांची भागीदारी रचली. हेन्री निकोल्स 31 धावा करून बाद झाला. त्यानंतर डॅरिल मिशेलने डावाची जबाबदरी सांभाळली. रायस मारियुने 58 धावांची खेळी
हेही वाचा : LSG VS MI : लाईव्ह मॅचमध्ये दिग्वेश राठीची पुन्हा वादग्रस्त कृती, BCCI चा दणका! ऋषभ पंतलाही बसली झळ
येथून डॅरिल मिशेल आणि टिम सेफर्ट यांनी डावाची सारी सूत्रे सांभाळली. यानंतर दोघांमध्ये 61 धावांची भागीदारी झाली. टीम सेफर्ट 26 धावा करून लवकर बाद झाला. त्यानंतर कर्णधार मायकेल ब्रेसवेलने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि मिशेलसोबत डाव पुढे सरकवण्याची मोठी कामगिरी केली. मिशेल 43 धावां करून बाद झाला. त्यानंतर ब्रेसवेलने आपली आक्रमक शैली सुरू ठेवत 40 चेंडूत 59 धावा केल्या. तर महंमद अब्बासने 11 धावा केल्या. पाकिस्तानकडून अकिफ जावेदने 4, नसीम शाहने 2, सुफियान माकिमने 1 आणि फहीम अश्रफने 1 गडी बाद केला.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला पाकिस्तानचा संघ 221 धावांपर्यंतच मजल मारू शकला. इमाम दुखापतीमुळे लवकर निवृत्त झाला. त्यानंतर आलेला अब्दुल्ला शफीक आणि बाबर आझम यांच्यात 68 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान अब्दुल्लाने 33 धावांची खेळी केली. त्यानंतर उस्मान खान 12 धावा करून माघारी गेला. बाबर आझमही 50 धावा करून बाद झाला. त्यानंतर रिझवानने 37, आगा सलमानने 11 आणि तय्यब ताहिरने 33 धावा केल्या.
हेही वाचा : Sara Tendulkar ची क्रिकेटमध्ये धमकेदार एण्ट्री! जीईपीएलमध्ये बनली ‘या’ संघाची मालकीण..
वास्तविक पाहता पाकिस्तानच्या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली होती. पण, त्याचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नाही. पाकचे ठराविक अंतराने बळी जात राहिले. त्यामुळे पाकिस्तानाला या सामन्यातही पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानचे फलंदाज जास्त वेळ मैदनावर तग धरू शकले नाही, त्यांनी लवकर आपली विकेट्स गमावली. न्यूझीलंडकडून बेन सियर्सने 5, मायकेल ब्रेसवेलने 1 बळी, जेकब डफीने 2 विकेट, मुहम्मद अब्बासने 1 बळी आणि डॅरिल मिशेलने 1 बळी घेत सामना जिंकला.