अलीम खान(फोटो-सोशल मीडिया)
Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणे उध्वस्त करण्यात आले आहे. मात्र, अशातच पाकिस्तान क्रिकेटमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 22 वर्षीय पाकिस्तानी क्रिकेटर अलीम खान यांचे निधन झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २२ वर्षीय अलीम खान पीसीबी चॅलेंज लीगमध्ये खेळत होता. ५ मे रोजी एका सामन्यादरम्यान, अलीम गोलंदाजी करत असताना अचानक जमिनीवर कोसळला. तो रन-अप घेत असताना हे घडले. तो अचानक पडला तेव्हा पंचांनी ताबडतोब वैद्यकीय पथकाला मदतीसाठी बोलवून घेतले. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हृदयविकाराच्या झटक्याने पाकिस्तानी गोलंदाज आलीम खान जमिनीवर पडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले पण त्याचा जीव वाचवण्यात मात्र यश आले नाही. डॉक्टरांनी या गोष्टीला दुजोरा देण्यात आला की, त्याच्या मृत्यूचे कारण हे हृदयविकाराचा झटका होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अलिमच्या मृत्यूवर तीव्र शोक व्यक्त केला आहे, तर देशांतर्गत क्रिकेट संचालक अब्दुल्ला खुर्रम नियाझी यांनी अलीमच्या शोकाकुल कुटुंबाला शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
अलीम खान हा एक प्रतिभावान आणि उदयोन्मुख क्रिकेटपटू होता. ज्याने अलिकडेच देशांतर्गत खेळल्या गेलेल्या क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून त्याने आपली छाप सोडली होती. तो खालच्या फळीत उपयुक्त फलंदाजी करू शकत होता, ज्यामुळे अंतिम अकरामधील त्याची भूमिका महत्त्वाची बनली होती. दरम्यान, पाकिस्तान सुपर लीग सुरू आहे, जी यापूर्वी भारतात देखील प्रसारित करण्यात आली होती. पण पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पीएसएलच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली असून पाकिस्तानी खेळाडूंच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा : Rohit Sharma : रोहित शर्माचा प्लॅन होता तयार? 2 महीने आधीच कसोटी क्रिकेटला करणार होता अलविदा, वाचा सविस्तर…
भारत सरकारकडून भारतातील पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे अकाउंटवर देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच भारतात पीएसएल आणि त्यांच्या संघांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही बंदी घालण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका आधीच थांबवण्यात आल्या आहेत. आता हल्ल्यांनंतर बीसीसीआयने आयसीसीकडे मागणी करण्यात आली आहे की, त्यांना आयसीसी स्पर्धांमध्येही पाकिस्तानसोबत गटबद्ध करू नये. यामुळे भविष्यात दोघांमधील सामन्यांची शक्यता देखील आणखी कमी होणार आहे.