पाकिस्तानचा नामिबियासमोर 200 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
PAK vs NAM, T20 World Cup 2026 : कोलंबो येथील सिंहली स्पोर्ट्स क्लब येथे पाकिस्तान आणि नामीबिया यांच्यात २०२६ च्या आयसीसी टी२० विश्वचषकातील ३५ वा सामना खेळला जात आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाने साहिबजादा फरहानच्या नाबाद शतकाच्या जोरावर ३ गडी गमावून १९९ धावा उभ्या केल्या आणि नामिबियासमोर २०० धावांचे टार्गेट दिले.
हेही वाचा : अरेरे पाकवर काय ही वेळ! ‘आम्ही भांडीही धुतली…’ कर्णधाराने हॉटेलमध्ये मिळालेल्या वागणुकीची कहाणी उलगडली
पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य असल्याचे ठरवून दिले. सलामीवीर साहिबजादा फरहानच्या नाबाद शतकामुळे, पाकिस्तानने चालू टी२० विश्वचषकातील गट टप्प्यातील ३५ व्या सामन्यात ३ विकेट्स गमावून १९९ धावा केल्या. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. तथापि, कर्णधार सलमान आणि फरहान यांच्या भागीदारीमुळे संघ बळकट स्थितीत आला. त्यानंतर पाकिस्तानने सलग सलमान आणि ख्वाजा नाफे यांची विकेट गमावली. परंतु शेवटी, शाबाद खानने चौथ्या विकेटसाठी नाबाद ८१ धावांची महत्वाची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. साहिबजादा फरहानने ५८ चेंडूचा सामना करत ११ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद १०० धावा फटकवल्या. तर सलमानने २३ चेंडूत ३८ धावा केल्या आणि शाबाद खानने नाबाद ३६ धावा फटकवल्या.
हेही वाचा : Pakistan च्या पंतप्रधानांना नेमका कोणी केला फोन? India सोबत T20 वर्ल्डकप मॅच खेळायला झटक्यात झाले तयार
या सामन्यात एक गोष्ट लक्षात घायायला हवी की, जर नामिबियाने या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले तर २०२४ प्रमाणेच अमेरिका पुन्हा एकदा सुपर ८ मध्ये पाकिस्तानची जागा घेईल. तसेच, या सामन्यावर पावसाचे सावट आहे. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर पाकिस्तान सुपर ८ मध्ये स्थान मिळविण्यास पात्र ठरणार आहे. कारण पाकिस्तानचे पाच गुण होणार आणि त्यामुळे संघ सुपर ८ मध्ये सहज प्रवेश करेल.
नामिबिया प्लेइंग इलेव्हन : लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन, गेर्हार्ड इरास्मस (कर्णधार), अलेक्झांडर वोल्शेंक, जेजे स्मित, झेन ग्रीन (कर्णधार), रुबेन ट्रम्पेलमन, विलेम मायबर्ग, बर्नार्ड स्कोल्झ, जॅक ब्रासेल
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान (कर्णधार), ख्वाजा नाफे, शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, सलमान मिर्झा, उस्मान तारिक






