बांगलादेशला नमवून पाकिस्तान आशिया कप फायनलमध्ये (फोटो सौजन्य - Instagram)
आशिया कपच्या अंतिम सामन्यासाठी बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात बांगलादेश पाकिस्तानच्या १३६ धावांच्या लक्ष्याचा केला. पाकिस्तानने ठेवलेले लक्ष्या बांगलादेशसाठी अत्यंत कठीण ठरल्याचे पहिल्या १० ओव्हर्समध्ये दिसून आले. मात्र मधल्या फळीने डाव सावरण्याचा प्रयत्न बांगालदेशच्या खेळाडूंनी केला, तरीही पाकिस्तानच्या गोलंदाजानी हा डाव हाणून पाडला. काही सुंदर शॉर्ट्स लावण्याचे प्रयत्न बांगलादेशच्या खेळाडूंनी केले होते. मात्र या नादात त्यांनी आपल्या विकेट्सदेखील गमावल्या. मात्र शेवटपर्यंत बांगलादेशच्या खेळाडूंनी लढा दिला.
बांगलादेशची गोलंदाजी
बांगलादेशी गोलंदाजांनी पहिल्या डावात शानदार कामगिरी करत पाकिस्तानची फलंदाजी लाईनअप उध्वस्त केली. अंतिम सामन्यासाठीच्या या ‘करो या मरो’ सामन्यात मोहम्मद हरिसने पाकिस्तानसाठी सर्वाधिक ३१ धावा केल्या. पाकिस्तानचा टॉप ऑर्डर मात्र पूर्णपणे अपयशी ठरला आणि पॉवरप्ले वाया घालवला. दरम्यान, सॅम अयुबने पुन्हा एकदा शून्यावर बाद होऊन विक्रम प्रस्थापित केला. बांगलादेशकडून तस्किन अहमदने सर्वाधिक तीन बळी घेतले.
तत्पूर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजचा सामना जिंकणारा संघ आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल आणि अंतिम सामन्यात भारताशी सामना करेल. यापूर्वी, २० सप्टेंबर रोजी, बांगलादेशने श्रीलंकेला हरवून पहिला सुपर ४ सामना खेळला. तथापि, त्यानंतर त्यांनी भारताविरुद्धचा दुसरा सुपर ४ सामना गमावला.
साहिबजादा फरहानचा अहंकार काढला बाहेर
या सामन्यात पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने डावाची सुरुवात केली. त्याने तस्किन अहमदच्या चेंडूवर एक शक्तिशाली चौकार मारला. तथापि, पुढच्याच चेंडूवर शॉट घेण्याचा प्रयत्न करताना फरहानने पॉइंट फिल्डरला झेल दिला. यामुळे केवळ चार धावा काढून त्याचा डाव संपला आणि भारतासमोरचा त्याचा अहंकार अशा पद्धतीने बाहेर पडला.
BAN vs PAK : पाकिस्तानी फलंदाजांची हराकिरी; बांगलादेशसमोर136 धावांचे लक्ष्य; तस्किन अहमद चमकला
बांगलादेशचा संघ ६३ धावांत अर्ध्यावर बाद
गोलंदाजीत दमदार कामगिरी करणाऱ्या बांगलादेशी संघाला १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अपयश आले. त्यांनी फक्त ६३ धावांत पाच विकेट गमावल्या. त्यानंतर ६ आणि ७ व्या विकेट्ससाठी खेळाडूंनी टिकून राहण्याचा प्रयत्न केला मात्र पाकिस्तानी गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही आणि काही अंतराच्या फरकाने खेळाडू तंबूत परतले. केवळ १३६ धावांचे लक्ष्यही बांगलादेश गाठू शकला नाही.
पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान सामना
२८ सप्टेंबर रोजी आता ४१ वर्षांनी पहिल्यांदाच आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार असून या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आशिया कप भारताकडे येणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि पाकिस्तानकडून हरणे भारताला अजिबात मान्य होणार नाही. त्यामुळे भारताचा विजयी रथ अंतिम सामना जिंकूनच भारतात परत येईल अशी अपेक्षा आता चाहते करत आहेत. सूर्यकुमार यादवची ही टीम पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल आणि हा सामना जिंकूनच येईल अशी चाहत्यांनी मनोमन प्रार्थना आहे.
दोन्ही संघ कसे आहेत?
बांग्लादेश (प्लेइंग इलेव्हन): सैफ हसन, परवेझ हुसैन इमॉन, तौहीद हृदोय, शमीम हुसेन, झाकेर अली (यष्टीरक्षक/कर्णधार), नुरुल हसन, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद