फोटो सौजन्य - शुभंकर मिश्रा युट्युब
नवदीप सिंह : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या पॅरा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत २९ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये सात सुवर्ण, ९ रौम्य पदक आणि १३ कांस्यपदक नावावर केले आहेत. २०२४ मध्ये भारताने 7 सुवर्णपदके जिंकली होती, त्यापैकी नवदीपने भालाफेक F41 स्पर्धेत एक सुवर्ण जिंकले. सुवर्णपदक जिंकल्यानंतर नवदीप खूपच आक्रमक दिसत होता, जे पाहून चाहत्यांना विराट कोहलीची आठवण झाली. सध्या भारताचा पॅरा भालाफेकपटू नवदीप सिंह सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर त्याच्या मुलाखती सुद्धा व्हायरल आहेत. आता नुकतीच त्याची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये त्याने त्याचा आवडता क्रिकेट खेळाडू कोण आहे याचा खुलासा केला आहे.
शुभंकर मिश्रा यांच्या युट्युब चॅनेलला एक नवदीप सिंह याची मुलाखत प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी त्याला विचारले की, बहुतेकांना नवदीप हा विराट कोहलीचा चाहता आहे असे वाटू लागले, पण तसे नाही. तो विराट कोहली किंवा एमएस धोनीचा चाहता नाही. शुभंकर मिश्राच्या यूट्यूब चॅनलवर बोलत असताना नवदीपने त्याच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल खुलासा केला. नवदीपने सांगितले की तो भारतीय कर्णधार रोहित शर्माचा चाहता आहे. मग नवदीपला विचारण्यात आले की तो रोहित शर्माचा चाहता का आहे? त्याला उत्तर देताना तो म्हणाला की, रोहित ज्या पद्धतीने खेळतो आणि त्याने जे द्विशतक झळकावले, तेव्हापासून तो त्याचा चाहता आहे.
नवदीप सिंह याने त्याच्या स्पर्धेमधील एक किस्सा शेअर केला होता ही घटनेचे व्हिडीओ नाही परंतु त्याने सोशल मीडियावर सांगितलं होता. ‘माँ कसम खाओ’ही कथा सांगताना नवदीप म्हणाला, “मी कोचकडे गेलो. मी म्हणालो, कोच साहेब, मी फेक पाहिला नाही, किती मीटर गेला? तो म्हणाला 46 मीटर. मग मी प्रशिक्षकाला सांगितले. मला खरे सांगा, मजा करू नका प्रशिक्षक “खरोखर, तेच आहे. मी प्रशिक्षकाला सांगितले, ‘घ्या शपथ, माझा विश्वास बसत नाही.’ ही घटना पॅरिस पॅरालिम्पिकमधील स्पर्धेच्या पहिल्या थ्रोची आहे.