फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा समारोप समारंभ ११ ऑगस्ट रोजी मध्यरात्री पार पडला. यामध्ये भारताचे मनु भाकर आणि पीआर श्रीजेश हे ध्वजवाहक होते. यंदा भारताचे ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झाले होते. भारताने ६ पदकांची कमाई केली आहे यामध्ये ५ कांस्यपदक आणि एक सिल्वर मेडलचा समावेश आहे. बरेच खेळाडू हे त्यांचे खेळ संपल्यानंतर भारतामध्ये परतले होते. त्यामुळे आता काहीच खेळाडू हे भारतामध्ये परतणे शिल्लक आहेत. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले सर्व ॲथलेटिक्स लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. ॲथलेटिक्स पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधी आणि कुठे भेटणार यासंदर्भात माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
७८ वा स्वतंत्रदिन १५ ऑगस्ट रोजी आयोजित केला जाणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झालेले ॲथलेटिक्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १५ ऑगस्ट रोजी म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यदिनी भेटणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता पंतप्रधान मोदी संपूर्ण भारतीय टीमला भेटतील. भारतीय ऑलिम्पिक संघातील प्रत्येक खेळाडूला १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे सर्व 117 खेळाडू स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर उपस्थित राहणार आहेत.
हेदेखील वाचा – विनेश फोगाट मेडलशिवाय भारतात परतणार? पहिला लुक आला समोर
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटसाठी गेले काही दिवस अडचणींनी दिसली. निर्धारित मानकांपेक्षा १०० ग्रॅम जास्त वजन आढळल्याने अंतिम सामना खेळण्यापूर्वीच तो ऑलिम्पिकमधून बाहेर फेकला गेला. यावर त्यांनी सीएएसकडे अपील केले, जे विनेशला रौप्य पदक देण्याच्या मुद्द्यावर १३ ऑगस्ट रोजी निर्णय दिला जाणार आहे. या विषयावर पीएम मोदींनी विनेशला पाठिंबा दर्शवला आणि म्हटले की, ती चॅम्पियन आहे. विनेशचे मनोबल वाढवण्यासाठी ते असेही म्हणाले की अशा घटना अनेकदा हृदयद्रावक असतात, परंतु या दुःखद घटनेचे वर्णन करण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नाहीत.