एमएस धोनी-मथिशा पाथिराना : महेंद्र सिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) भारतातचं नाही जगभरामध्ये आदर केला जातो. सर्वात श्रेष्ठ भारतीय कर्णधार म्हणून त्यांचे नाव पुढे आहे. त्याचबरोबर त्याने चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) संघाला पाच विजेतेपद मिळवून सुद्धा दिले आहेत. एवढेच नव्हे तर एमएस धोनी, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्ज, त्याच्या शांत स्वभावासाठी, मैदानावरील चाणक्य धोरण आणि युवा खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी ओळखला जातो. 2007 च्या T20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध जोगिंदर शर्माला शेवटचे षटक टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याने पहिल्यांदाच आपल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. यानंतर लोक त्याला त्याच्या धक्कादायक निर्णयासाठी ओळखतात.
इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या या सीझनमध्ये अनेक तरुण खेळाडूंना तो खेळाच्या टिप्स देत असतो. तो वेगवान गोलंदाज म्हणजे श्रीलंकेचा क्रिकेटर मथिशा पाथिरानाला (Matheesha Pathirana) नेहमीच मैदानात टिप्स देतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकताच एक मथिशा पाथिरानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लायन्स अपक्लोजच्या व्हिडिओमध्ये, मथिशा पाथिरानाने धोनीबद्दल काहीतरी सांगितले आहे, ज्यामुळे तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
या व्हिडिओमध्ये पाथिराना धोनीला आपले वडील मानतो, असे म्हटले आहे. व्हिडिओमध्ये पाथिरानाने सांगितले की, “माझ्या वडिलांनंतर धोनी सर क्रिकेटच्या मैदानावर सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ते माझी काळजी घेतात, मला सल्ला देतात. जसे वडील घरी करतात. धोनी सर जास्त बोलत नाहीत पण ते नेहमी खेळाचा आनंद घ्या आणि तंदुरुस्त राहा असे सांगतात. मैदानावर तो काही खास बोलत नाही पण मैदानाबाहेर तो छोट्या छोट्या गोष्टी सांगतो ज्यामुळे मला खूप फरक पडतो. आणि मला त्या गोष्टींवरून खूप आत्मविश्वास मिळतो.”
श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज हे सांगायलाही विसरला नाही की, “आम्ही क्रिकेटच्या बाहेर जास्त बोलत नाही. पण मला काही विचारायचे असेल तर मी थेट त्याच्याकडे जातो. तो नेहमी म्हणतो – ‘तुमच्या खेळाचा आनंद घ्या आणि तुमच्या शरीराची काळजी घ्या. . काळजी घ्या’.”