फोटो सौजन्य : IndianPremierLeague
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स पहिल्या डावाचा अहवाल : सवाई मानसिंग स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार फाफ डुप्लेसी याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये पंजाब किंगच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत दिल्ली कॅपिटल्स समोर 207 लक्ष्य उभे केले आहे. या सामन्यात पहिल्या डावामध्ये खेळाडूंची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
पंजाब किंग्सच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर संघाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज प्रभसिमरण सिंह आणि प्रियांश आर्या हे दोघेही मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरले. प्रियांश आर्यानेच आजच्या सामन्यात ९ चेंडूंमध्ये फक्त सहा धावा केल्या आणि विकेट गमावली. प्रभसिमरण याने आज संघासाठी 28 धावांची खेळी खेळली यामध्ये त्याने एक षटकार आणि चार चौकार मारले. जोश इंग्लिशने आज संघासाठी 32 धावा केल्या. मागील सामन्यांमध्ये दमदार खेळी खेळणारा नेहल वढेरा याने आज फक्त 16 धावा केल्या.
पंजाब किंग्सच्या कर्णधार श्रेयस अय्यरने आजच्या सामन्यात अर्धशतकीय खेळी खेळली यामध्ये त्याने 34 चेंडूंमध्ये 53 धावा केला यात दोन षटकारांचा समावेश आहे त्याचबरोबर पाच चौकार मारले आहेत. शशांक सिंग आज मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला त्याने 10 चेंडूंमध्ये फक्त 11 धावा केल्या आणि विकेट गमावली. अजमततुला उमरजाई याने फक्त तीन चेंडू खेळले आणि बाद झाला.
Innings break!
A solid innings from skipper Shreyas Iyer and a late cameo from Stoinis helps #PBKS set a target of 207 for #DC 💪
Scorecard ▶ https://t.co/k6WP8zBwzL #TATAIPL | #PBKSvDC pic.twitter.com/wt0wuPjYGZ
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2025
मार्कस स्टॉयनिस याने आजच्या सामन्यात कमालीची खेळी खेळली. स्टॉईनीस ने आजच्या सामन्यात 16 चेंडूंमध्ये 44 धावा केल्या यामध्ये त्याने चार षटकार मारल्या आणि तीन चौकार मारले. आजच्या या खेळीने त्याने क्रिकेटच्या त्यांना प्रभावित केले. मार्को यांसन आज विशेष कामगिरी करू शकला नाही तर त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. हरप्रीत ब्रार हा फलंदाजीला आला होता त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.
बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान याने आजच्या सामन्यात चांगली कामगिरी केली त्याने संघासाठी तीन विकेटची कमाई केली. मुकेश कुमारच्या हाती आज एक विकेट लागली तर विपराज निगम आणि कुलदीप यादव या दोघांनीही प्रत्येकी दोन दोन विकेट्स नावावर केले.