गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
Bengaluru stampede : आरसीबीने ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर इतिहास रचला. १७ वर्षांनंतर आरसीबी संघाने आयपीएल २०२५ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. जेतेपदाच्या सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जचा ६ धावांनी धुव्वा उडवला आहे. पहिल्यांदा आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबी चाहत्यांचा उत्साह वाढला होता, त्यानंतर देशभर जल्लोष साजरा करण्यात आला. त्याच वेळी आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत ११ जणांना जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले. आता या प्रकरणावर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर चांगलाच संतापला आहे.
बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी गौतम गंभीर याने आरसीबीला चांगलेच सुनावले आहे. एम. चिन्नास्वामी चेंगराचेंगरीवर त्याने प्रतिक्रिया दिली आहे. ६ जून रोजी भारतीय कसोटी संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. याच्या एक दिवस आधी, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. ही पत्रकार परिषद इंग्लंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती.
मुंबईतील पत्रकार परिषदेदरम्यान, गौतम गंभीरने बंगळुरूमधील घटनेचे दुःखद वर्णन केले. गौतम गंभीर म्हणाला की, “मी रोड शोवर अजिबात विश्वास ठेवत नाही. जेव्हा मी खेळायचो आणि आम्ही टी-२० विश्वचषक जिंकलो तेव्हाही मी या शोच्या बाजूने नव्हतो. लोकांचे जीवन अधिक महत्त्वाचे आहे. बंगळुरूमध्ये जे घडले ते वेदनादायक आहे.” अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली आहे.
हेही वाचा : ENG vs IND : ‘आमचा संघ संतुलित, मला संघावर विश्वास..’, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याचे मत..
तसेच गौतम गंभीरने इंग्लंड दौऱ्याबद्दल बोलताना म्हटले आहे की, आमच्याकडे चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत. यापूर्वी, टीम इंडियाने त्याच्याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली होती. या मालिकेतही याची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. पुढे गंभीर म्हणाला की, इंग्लंड दौऱ्यात तरुण खेळाडूंना चांगली कामगिरी करण्याची संधी असणारआहे.
२० जूनपासून भारत आणि इंग्लंड या दोन संघात कसोटी मालिकेला सुरवात होता आहे. बीबीसी स्पोर्टच्या अहवालानुसार भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेचे नाव बदलण्यात आले असून आता दोन्ही देशांच्या दोन महान खेळाडूंच्या नावावर या मालिकेच्या ट्रॉफीचे नाव असणार आहे. या अहवालात म्हटले आहे की इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून या कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला देण्यात येणाऱ्या ट्रॉफीचे नाव माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.