कर्नाटक क्रिकेट असोसिएशनची उच्च न्यायालयात धाव!(फोटो-सोशल मिडिया)
Chinnaswamy Stadium Stampede : १७ वर्षांनंतर आरसीबी संघाने आयपीएल २०२५ ची ट्रॉफी जिंकली. जेतेपदाच्या सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जचा ६ धावांनी धुव्वा उडवला. पहिल्यांदा आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबी चाहत्यांचा उत्साह वाढला होता, त्यानंतर त्यांनी देशभर जल्लोष केला. आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत ११ जणांना जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. आयपीएलच्या इतिहासात अशी दुर्दैवी घटना पहिल्यांदाच घडली आहे. घटनेनंतर, आरसीबी व्यवस्थापन आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशन(केसीए)विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. आता केएससीएकडून या एफआयआरविरुद्ध न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : ENG vs IND : ‘आमचा संघ संतुलित, मला संघावर विश्वास..’, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याचे मत..
बेंगळुरू चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी राहुराम भट आणि त्यांच्या काही सहकारी अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. केएससीएने उच्च न्यायालयाकडे एफआयआर रद्द करण्याची विनंती केली आहे.एक गोष्ट उल्लेखनीय आहे की, पोलिसांकडून गेल्या गुरुवारी आरसीबी, इव्हेंट मॅनेजमेंट फर्म डीएनए एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध ही एफआयआर नोंदवण्यात आली आह.
या प्रकरणी आता कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार संरक्षण देण्यात आले आहे. आता उच्च न्यायालय ९ जून रोजी निखिल सोसले यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : भारत-इंग्लंड मालिकेत तेंडुलकरसह अँडरसनची एंट्री! इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय…
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणाचे निरीक्षण करणाऱ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व्यवस्थापनाने पोलिसांच्या परवानगीशिवाय बंगळुरूमध्ये विजय परेड होणारा असल्याचे जाहीर केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरुन विजय परेडची माहिती देण्यात आली होती. त्यांची ही पोस्ट अल्पावधीतच १० लाखांहून अधिक वेळा लोकांनी पाहिली गेली. त्यानंतर ४ जून रोजी एम. चिन्नास्वामी यांच्यासमोर प्रचंड गर्दी जमली आणि ही दुर्घटना घडली आणि त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
चेंगराचेंगरीची घटना घडण्यामागील मुख्य कारण म्हणजे आरसीबीने मोफत प्रवेशाची घोषणा केली होती. त्यानंतर पोलिसांकडून शक्य तितक्या कमी नोंदणी करण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते. त्याच वेळी, पोलिसांनी असेह देखील सांगितले होते की हे उत्सव रविवारीच आयोजित केला पाहिजे. जेणेकरून त्यांना सुरक्षा व्यवस्थेसाठी अधिकचा वेळ मिळणार. दुसरीकडे, राज्य सरकारने पोलिसांनी दिलेल्या या सूचनेकडे दुर्लक्ष केले. यामुळेच बंगळुरू पोलिसांना या भव्य कार्यक्रमासाठी जास्त वेळ मिळाला नाही आणि त्यांना गर्दीला नियंत्रित करणे शक्य झाले नाही. या कारणामुळे ही दुर्दैवी घटना घडली.