शुभमन गिल(फोटो-सोशल मिडिया)
ENG vs IND : विराट कोहली आणि रोहित यांनी अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अशा परिस्थितीत, इंग्लंड दौऱ्यावर दोन्ही दिग्गजांच्या अनुपस्थिती जाणवणार आहे. एवढ्या दिग्गजांची जागा भरणे कठीण असले तरी आमच्या संघावर कोणताही अतिरिक्त दबाव नाही आणि मला संघावर विश्वास आहे असे मत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याने व्यक्त केले. मोठ्या इंग्लंड येथे होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ कसोटी क्रिकेटचा नवा युवा कर्णधार शुभमन गिल याच्या नेतृत्वात गुरुवारी रवाना झाला. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत गिल बोलत होता.
यादरम्यान संवाद साधतांना कर्णधारपदाबद्दल गिल म्हणाला, संघाचा कर्णधार होण्याची संधी मिळाल्याबद्दल मला खूप आनंद झाला. संघाचा कर्णधार होण्याची संधी मिळाल्याने मी भारावून गेलो. इंग्लंड दौरा आव्हानात्मक असला तरी मला माझ्या संघावर विश्वास आहे. इंग्लंडचा संघ एका विशिष्ट पद्धतीने खेळतात. आम्ही भारतात ते पाहिले. यामुळे आम्हाला संधी मिळते. जर आम्ही आमच्या कामगिरीत सक्रिय राहिलो तर यश मिळणारच आहे. शुभमन गिल फलंदाजी क्रमवारीवर बोलला, मी अद्याप निर्णय घेतलेला नाही. आम्ही इंट्रा-स्क्वॉड सामना खेळ आणि लंडनमध्ये १० दिवसांचा शिबिर घेऊ.
हेही वाचा : IND Vs ENG : भारत-इंग्लंड मालिकेत तेंडुलकरसह अँडरसनची एंट्री! इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय…
आम्ही तिथे गेल्यानंतरच फलंदाजी संयोजन ठरवू बुमराह नेमके किती सामने खेळणार ठरले नाही गौतम गंभीर म्हणाले, बुमराह कोणते तीन सामने खेळेल हे आम्ही अद्याप ठरवलेले नाही. आम्ही त्याच्याशी याबद्दल बोलू आणि ते मालिकेवर, निकालांवर आणि मालिकेच्या दिशेने अवलंबून असेल. मला खात्री आहे की त्यालाही याची चांगली जाणीव आहे. बुमराहसारख्या खेळाडूची जागा घेणे कठीण आहे पण आमच्याकडे पुरेशी प्रतिभा आहे. मी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये म्हटल्याप्रमाणे, यामुळे दुसऱ्या खेळाडूला पुढे येण्याची संधी मिळते. रोहित शर्माने रेड-बॉल क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुभमन गिलने नवीन कसोटी कर्णधार म्हणून संघाची सूत्रे हाती घेतली आहेत. आम्ही पुरेसे गोलंदाज निवडले आहेत. आमचे अनेक वेगवान गोलंदाज कोणत्याही परिस्थितीत आम्हाला कसोटी सामने जिंकून देण्यासाठी सर्वोत्तम स्थितीत आहेत. जेव्हा तुमच्याकडे जसप्रीत बुमराहसारखा खेळाडू असतो, तेव्हा तो किती सामने खेळतो यावर अवलंबून, ते आमच्यासाठी एक उत्तम दृश्य असेल. जसप्रीत बुमराहची जागा घेणे कठीण आहे.
रोड शोसाठी माझा कायम नकारच रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूने आयपीएलचे विजेतेपद जिंकले. आरसीबीने विजेतेपदाचे सेलिब्रेशन करण्यासाठी आरसीबी संघ दुसऱ्याच दिवशी बुधवारी बंगळुरूत दाखल झाला होता. स्टेडियममध्ये सत्कार सोहळा सुरू असताना बाहेर मात्र चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत ११ जणांनी जीव गमावले, तर अनेक जण जखमी आहेत. यावर गंभीर म्हणाला, जे झालं, ते दुर्देवी होतं. मी स्वतः कधीही रोड शो करण्यासाठी उत्सुक नव्हता. आनंद साजरा व्हायला हवा, सेलिब्रेश व्हायला हवे, पण व्यक्तीचा जीव अधिक महत्त्वाचा आहे. तेंडुलकर-अँडरसन नावाने चषक: इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिका आता सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांच्या नावावर असलेल्या नवीन ट्रॉफीसाठी खेळली जाईल. २० जून रोजी हेडिंग्ले येथे सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेपूर्वी तेंडुलकर-अँडरसन चषकाचे अनावरण केले जाईल.