फोटो सौजन्य - KolkataKnightRiders सोशल मीडिया
Punjab Kings vs Kolkata Knight Riders 1st innings report : पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्येस सामना सुरु आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पाहिलं फलंदाजी करणार असा निर्णय त्याने घेतला. पण हा त्याचा निर्णय त्याला चांगलाच महागात पडला आहे. आज कोलकाताच्या गोलंदाजांनी अविश्वनीय कामगिरी केली. पंजाब किंग्सच्या एकही फलंदाजाला गोलंदाजांनी चालू दिले नाही. पहिल्या डावाचा खेळ झाल्यानंतर कोलकाता नाईट राइडर्सचसमोर 112 धावांचे लक्ष्य असणार आहे.
पंजाबच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर एकही फलंदाज संघासाठी मोठी कामगिरी करू शकला नाही. सलामीवीर फलंदाज प्रियांश आर्या आणि सिमरजीत सिंह आज दोघेही फेल ठरले. सिमरजीत सिंहने संघासाठी १५ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या तर प्रियांश आर्याने संघासाठी १२ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आज त्याच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. हर्षित राणाने श्रेयस अय्यरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जोश इंग्लिश आज संघासाठी पहिला सामना खेळला पण तो मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. नेहाला वढेराने ९ चेंडूंमध्ये १० धावा केल्या आणि अँरिक नॉर्टजेने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.
Innings Break!
An exceptional bowling performance from #KKR, led by Harshit Rana, bundles #PBKS for 1️⃣1️⃣1️⃣
Updates ▶️ https://t.co/sZtJIQoElZ#TATAIPL | #PBKSvKKR pic.twitter.com/cbWTsmAPii
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2025
ग्लेन मॅक्सवेलने संघासाठी आणखी एकदा निराशाजनक कामगिरी केली. तो १० धावा करून बाद झाला. सुर्यांश शेंडगे याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघामध्ये स्थान मिळाले होते पण तो देखील आजच्या सामन्यात फेल ठरला. साशंक सिंह याने १७ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. झेवियर बार्टलेट याने १५ चेंडूंमध्ये ११ धावा केल्या.
कोलकाता नाईट राइडर्सच्या गोलंदाजीची सांगायचे झाले तर हर्षित राणाने संघासाठी तीन विकेटची कमाई केली. हर्षित राणाने प्रियांश आर्या, प्रभासिमरन सिंह, श्रेयस अय्यर या तीनही पहिल्या पंजाब किंग्सच्या फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीने संघासाठी २ विकेट्स घेतले. तर सुनील नारायण याने सुद्धा आणखी एकदा त्याची जादू दाखवली आणि संघासाठी २ विकेटची कमाई केली. तर वैभव अरोडा आणि अँरिक नॉर्टजे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला.