फोटो सौजन्य - ICC
जसप्रीत बुमराह : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर तो काही महिने जगभरामध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकाचा नंबर १ वेगवान गोलंदाज होता. आता आयसीसी रँकिंगचे नवे आकडे समोर आले आहेत. यामध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. यामध्ये भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहकडून पहिला क्रमांककडून घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी पुरुष कसोटी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये कागिसो रबाडा गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर जोश हझलवूड आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावरून डायरेक्ट तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
सध्या कसोटी सामने सुरु आहे, आणि यामध्ये सर्व संघामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी संघांची शर्यत सुरु आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा चमकदार कामगिरी करत आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे, यामध्ये संघामध्ये कमालीची कामगिरी केली आहे आणि पहिला सामना नावावर केला आहे. तर दुसरीकडे भारताच्या संघाने तीन कसोटी सामान्यांच्या मालिकेत सलग दोन्ही सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत रबाडाने पहिल्या कसोटीत 9 विकेट घेतले आणि बांग्लादेशचा फलंदाजांना मैदानात टिकू दिले नाही. कसोटी फॉरमॅटमध्ये रबाडाने ३०० बळी पूर्ण केले. मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ९ विकेट्सने विजय मिळवला होता.
हेदेखील वाचा – BAN vs SA : बांग्लादेशविरुद्ध घराच्या मैदानावर साऊथ आफ्रिकेला केला धावांचा पाऊस! भारताचा विक्रम मोडण्यापासून वाचला
भारत न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहला एकही विकेट घेता आली नाही. तो दोन स्थानांनी घसरून तिसऱ्या स्थानावर आला आहे. फक्त जसप्रीत बुमराहचीच नाही यात भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचीही दोन स्थानांच्या घसरणीसह चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचाही पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये समावेश आहे.
पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत चमकदार गोलंदाजी करणारा पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज नोमान अली हा टॉप 10 मध्ये या नव्या खेळाडूची एंट्री झाली आहे. भारताविरुद्धच्या ऐतिहासिक मालिकेत न्यूझीलंडचा हिरो म्हणून उदयास आलेला मिचेल सँटनर पुढे गेला आहे. त्याच्या क्रमवारीत 30 व्या स्थानापर्यंत. पुणे कसोटीत 13 बळी घेणारा हा डावखुरा फिरकीपटू क्रमवारीत 44व्या स्थानावर पोहोचला आहे.
भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाललाही फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये मोठा फायदा झाला आहे. पुण्यात न्यूझीलंडविरुद्ध ३० आणि ७७ धावांचे योगदान देणाऱ्या यशस्वीने एका स्थानाने प्रगती करत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या फॉरमॅटमध्ये सध्या तो भारताचा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याचबरोबर भारताचा अष्टपैलू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी अनुक्रमे दोघांनी पहिले आणि दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला आहे. भारताच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत निराशाजनक फलंदाजी केली म्हणून फलंदाजीच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. यामध्ये भारताचे दोन फलंदाज रिषभ पंत आणि विराट कोहली या दोघांचे बंपर नुकसान झाले आहे. रिषभ पंत ५ स्थान मागे घसरला आहे आणि तो आता ११ व्या स्थानावर आहे, तर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली सहा स्थान खाली घसरला आहे सध्या तो १४ व्या स्थानावर आहे.