फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
बांग्लादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका : बांग्लादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या दोन सामान्यांची कसोटी मालिका सुरु आहे. यामधील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ७ विकेट्सने बांग्लादेशला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवलं. आता सध्या या दोन्ही संघामध्ये दुसरा सामना सुरु आहे. बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. या सामन्यात आफ्रिकन संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट गमावून ५७५ धावांवर आपला डाव घोषित केला, या सामन्यात पाहुण्या संघाने असे षटकार ठोकले की भारताचा विक्रम जवळपास मोडीत निघाला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी एकूण १७ षटकार ठोकले. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात संघाने मारलेला हा तिसरा सर्वाधिक षटकार आहे. एका डावात १८ षटकार मारण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे.
हेदेखील वाचा – IPL Retention 2025 : आयपीएल २०२५ च्या रिटेन्शनमध्ये या खेळाडूंना बसणार धक्का! वाचा संपूर्ण यादी
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. किवी संघाने २०१४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध एका डावात २२ षटकार मारले होते, त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही संघाला एका डावात २० किंवा त्याहून अधिक षटकार मारता आलेले नाहीत. तर भारत या यादीत १८ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाने २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध हा विक्रम केला होता.
Dutch-Bangla Bank Bangladesh 🆚 South Africa Test Series 2024 | 2nd Test
Stumps | Day 02 | Bangladesh trail by 537 runs#BCB #Cricket #BANvSA #WTC25 #TestCricket pic.twitter.com/iiPMa7wQkd
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 30, 2024
दक्षिण आफ्रिका आता १७ षटकारांसह या यादीत संयुक्त तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आफ्रिकन संघासह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. कांगारूंनी २००३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध इतकेच षटकार ठोकले होते.
22 षटकार- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, 2014
18 षटकार – भारत विरुद्ध इंग्लंड, 2024
17 षटकार- ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे, 2024
17 षटकार- दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, 2024
16 षटकार- श्रीलंका विरुद्ध आयर्लंड, 2023
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करत स्वतःचा दबदबा दाखवला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये ५७५ धावा केल्या. यामध्ये टोनी डी जोर्जी ने 177 धावांची खेळी खेळली, तर ट्रिस्टन स्टब्स 106 आणि वियान मुल्डर 105* यांच्या शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवशी ६ गडी गमावून ५७५ धावा करून पहिला डाव घोषित केला. यानंतर दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत बांग्लादेशने अवघ्या ९ षटकांत ३८ धावांवर ४ विकेट गमावल्या. दक्षिण आफ्रिका अजूनही ५३७ धावांनी पुढे आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिका १-० ने आघाडीवर आहे.