फोटो सौजन्य - Rajasthan Royals सोशल मीडिया
रोहित शर्मा आणि आकाश मधवाल यांचा व्हिडीओ : काल मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात मुंबईच्या संघाने राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर एकतर्फी पराभूत केले. या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थानला १०० धावांनी हरवले. सामन्यांमध्ये रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी अर्धशतक झळकवले. या सामन्यात गुरुवारी राजस्थान रॉयल्सकडून वेगवान गोलंदाज आकाश माधवालने आयपीएलमध्ये पदार्पण केले. पण राजस्थानच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आणि या पराभवासह राजस्थान प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर पडला.
आता आकाश माधवाल रोहित शर्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आकाश माधवाल रोहित शर्मा हे दोघेही त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत. सामन्यानंतर, आकाश माधवाल रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांचे हात जोडून स्वागत करताना दिसला. माधवालने रोहितच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि २०२३ च्या सीझनमध्ये त्याने प्रभावित केले. तथापि, त्याला गेल्या हंगामात खेळण्याची संधी मिळाली नाही आणि त्यानंतर आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी एमआयने त्याला सोडले. राजस्थान रॉयल्सने मेगा लिलावात माधवालला १.२ कोटी रुपयांना खरेदी केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, सामन्यानंतरच्या सादरीकरणादरम्यान माधवालने रोहितशी संवाद साधला. त्यानंतर रोहितने स्टँडमध्ये बसलेल्या त्याच्या पत्नी रितिकाकडे बोट दाखवले आणि माधवालनेही हात जोडून तिचे स्वागत केले. रितिकानेही चेहऱ्यावर हास्य घेऊन त्या तरुण खेळाडूला हात हलवला. रोहित आणि माधवाल यांनी गप्पा मारल्या आणि जर्सीवर सहीही केली.
Akash & his Rohit bhaiya 💗 pic.twitter.com/PSSbUcp5yI
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 2, 2025
सामन्यातील आकाश माधवालच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर ते काही खास नव्हते. आकाशला त्याच्या जुन्या संघाविरुद्ध एकही विकेट घेता आली नाही. त्याने ४ षटके टाकली आणि ९.८० च्या इकॉनॉमीने ३९ धावा दिल्या. रोहितच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने अर्धशतक झळकावले. मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधाराने ३६ चेंडूत ९ चौकारांसह ५३ धावांची खेळी केली. एवढेच नाही तर त्याने रायन रिकेल्टनसोबत पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली.
यासह, रोहित शर्मा आयपीएल संघाविरुद्ध ६००० धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी ५७५१ धावा केल्या आहेत आणि एकूण ६०२४ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये फ्रँचायझीसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे. पहिल्याच हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत २६२ सामन्यांमध्ये ८४४७ धावा केल्या आहेत.