फोटो सौजन्य - X/Royal Challengers Bengaluru
RCB vs KKR हवामानाचा अहवाल : रजत पाटीदार आणि अजिंक्य रहाणे आमनेसामने असणार आहे. आयपीएल 2025 आज रिस्टार्ट होणार आहेत. विराट कोहलीला आज पुन्हा मैदानात पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आजचा सामना हा चिन्नास्वामी स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वाढलेल्या तणावाच्या वातावरणामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती आता आयपीएल रिस्टार्ट होणार आहे. शनिवारी, १७ मे रोजी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. हा सामना बेंगळुरूच्या होमग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
चाहते सज्ज! विराट कोहलीला पांढऱ्या जर्सीत देणार ट्रिब्यूट, चिन्नास्वामीचा व्हिडिओ आला समोर
या सामन्यापूर्वी बेंगळुरूमधील चिन्नास्वामीचे हवामान चाहत्यांच्या मनात भिती निर्माण करत आहे. हवामान विभागाच्या मते, आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे चाहते खूप तणावात आहेत, परंतु काळजी करण्याची गरज नाही, जरी पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला तरी चिन्नास्वामीची ड्रेनेज सिस्टीम इतकी अद्भुत आहे की जरी हा सामना कमी षटकांचा असला तरी सामना होण्याची शक्यता आहे.
#TATAIPL 2025 returns in 𝟯 𝗛𝗢𝗨𝗥𝗦 & we 𝗖𝗔𝗡𝗡𝗢𝗧 𝗞𝗘𝗘𝗣 𝗖𝗔𝗟𝗠! 👊#RCB eye a Top 2 finish, while #KKR look to spoil the party and stay in #IPLRace2Playoffs! 🔥 Who takes the win in this high-stakes game? 🤔👇#IPLonJioStar 👉 #RCBvKKR | SAT, MAY 17, 6:30 PM on… pic.twitter.com/m5O37YhEjf — Star Sports (@StarSportsIndia) May 17, 2025
आजचा सामना आरसीबीच्या क्रिकेट चाहत्यासाठी फारच महत्वाचा असणार आहे. कारण विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला राम राम केला आहे. बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुमारे ४०,००० प्रेक्षक बसू शकतील अशी अपेक्षा आहे. या स्टेडियमच्या सीमा खूपच लहान आहेत, ज्याचा फायदा फलंदाज घेताना दिसतात. या मैदानाच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना विशेष मदत मिळते.