RCB vs RR : चिन्नास्वामीमध्ये बंगळुरूचा डंका!(फोटो-सोशल मिडिया)
RCB vs RR : काल म्हणजेच गुरुवार(24 एप्रिल) रोजी बंगळुरू आणि राजस्थान यांच्यामध्ये आयपीएलचा 42 वा सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने घरच्या मैदनावर आरआरचा दणदणीत पराभव केला. राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर 205 धावा केल्या. प्रतिउत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ 194 धावाच करू शकला. परिणामी आरआरला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी केली, जिथे विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांनी घरच्या मैदानावर म्हणजेच एम चिन्नास्वामी यांनी चमकदार फलंदाजी केली आणि बंगळुरूचा धावसंख्या २०० च्या पुढे नेली. इतकेच नाही तर संघाने १० वर्षांचा जुना विक्रम देखील मोडीत काढला.
वास्तविक पाहता, विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांच्या अर्धशतकांमुळे, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आयपीएलच्या सामन्यामध्ये आरसीबीने आणखी एक विक्रम केला आहे. संघाने प्रथम फलंदाजी करत उत्कृष्ट खेळ केला आणि २०० पेक्षा जास्त धावा उभ्या केल्या. ज्याचा स्वतःमध्ये खूप मोठा अर्थ असल्याचे बोले जात आहे.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून सीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. जे खुपदा संध्याकाळच्या सामन्यात कर्णधार करत असतो. आरसीबी संघाने २० षटकांत फक्त ५ गडी गमावून २०५ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासामध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध ही आरसीबीची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
यापूर्वी, याच मैदानावर म्हणजेच बेंगळुरूमध्ये, आरसीबीने २०१५ मध्ये राजस्थानविरुद्ध सात गडी गमावत २०० धावा केल्या होत्या. तेव्हापासून आरसीबीला या संघाविरुद्ध कधीही इतक्या धावा करता आलेल्या नाहीत. याचा अर्थ असा की आरसीबीने सुमारे १० वर्षांनी हा मोठा पराक्रम केला आहे.
विराट कोहलीला वेगवान सुरुवात करता आली नाही, परंतु त्याचा डाव जसजसा पुढे जात राहीला, तसतसा त्याने आपला फॉर्म दाखवला सुरवात केली, ज्यासाठी त्याची ओळखला आहे. विराट कोहलीने ४२ चेंडूत ७० धावांची शानदार खेळी केली. विराट कोहलीने या खेळीत 2 षटकार आणि ८ चौकार लागवले. त्याच वेळी, देवदत्त पडिक्कलने देखील शानदार अर्धशतक केले. त्याने २७ चेंडूत ५० धावा केल्या. त्यात त्याने बॅटवरून ३ षटकार आणि ४ चौकार निघाले. आरसीबीने राजस्थानला २०६ धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु, राजस्थान १९४ धावाच करता आल्या.
हेही वाचा : ‘त्याच्याकडे विचार करण्यासाठी…’, Rishabh Pant च्या IPL मधील फॉर्मवर Cheteshwar Pujara चे खळबळजनक विधान..
आयपीएलच्या या हंगामात बेंगळुरूला आतापर्यंत तीन पराभवांना समोरे जावे लागले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आरसीबीला तिच्या घरच्या मैदानावरच या तिन्ही पराभवांचा सामना करावा लागला आहे होता. राजस्थानविरुद्ध विजय मिळवून त्यांनी ही मालिका खंडित केली.