रोहन बोपण्णा – सुमित नागल : भारताचे टेनिस स्टार रोहन बोपण्णा आणि सुमित नागल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. रविवारी जर्मनीतील हेल्ब्रॉन नेकारकपमध्ये एटीपी चॅलेंजर विजेतेपद पटकावल्यानंतर नागलने ९५व्या क्रमांकावरून कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट क्रमवारीत ७७व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या बोपण्णाने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून दुहेरी स्पर्धेच्या पहिल्या १० मध्ये बसून आरामात आपला कोटा मिळवला आहे. रोहन बोपण्णा आणि सुमित नागल यांनी अनुक्रमे एकेरी आणि दुहेरी स्पर्धेत भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ कोटा मिळवला आहे. (फोटो सौजन्य – सुमित नागल इंस्टाग्राम अकाउंट)
[read_also content=”न्यूयॉर्कमध्येही आता चहल TV! पंत, अक्षर आणि सिराजने केली धक्कादायक रहस्ये उघड https://www.navarashtra.com/sports/chahal-tv-in-new-york-now-pant-akshar-and-siraj-reveal-shocking-secrets-546259.html”]
पुरुष आणि महिला एकेरी स्पर्धेत प्रत्येकी ६५ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी होणार आहेत. १० जून रोजी जाहीर झालेल्या ATP क्रमवारीनुसार पुरुष एकेरी स्पर्धेतील अव्वल ५६ खेळाडूंना त्यांचा कोटा मिळाला. प्रत्येक देश कमाल चार कोटा सुरक्षित करू शकतो. रँकिंगद्वारे कोट्यासाठी पात्र खेळाडूंमध्ये नागलने शेवटचे स्थान पटकावले आणि आपले स्थान निश्चित केले. टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खेळलेला नागल जानेवारीमध्ये क्रमवारीत १३८ व्या स्थानावर होता. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला चेन्नई ओपनमध्ये विजेतेपद मिळवून एटीपीच्या टॉप १०० मध्ये प्रवेश केला.
भारताचा ४४ वर्षीय रोहन बोपण्णाने जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जिंकले. त्याचबरोबर त्याने गेल्या आठवड्यात फ्रेंच ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठली. लंडन २०१२ गेम्स आणि रिओ २०१६ मध्ये रोहन बोपण्णाने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु त्याची टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पात्रता गमावली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जागतिक क्रमवारीत ६७व्या क्रमांकावर असलेल्या श्रीराम बालाजीची ऑलिम्पिकसाठी आपला जोडीदार म्हणून निवड करणे अपेक्षित आहे, कारण कोटा एनओसीने निश्चित केला आहे.