रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Rohit Sharma Test retirement : भारताचा दिग्गज कर्णधार रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या घोषणेने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निर्णयामुळे त्याचे चाहते खूप निराश झालेचे दिसत आहेत. कारण सर्वांना वाटत होते की तो इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत भाग घेईल परंतु या मालिकेपूर्वी त्याने आपली निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर आता लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की नेमकं अचानक असे काय झाले की कर्णधाराने फक्त इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करून कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले.
७ मे हा दिवस भारतीयांसाठी आनंद आणि दुःखाने भरलेला असा समिश्र भाव असणारा होता. सकाळी भारताने पाकिस्तानवर हल्ला करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, ज्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु, संध्याकाळी रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातमीने क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. तथापि, काही लोकांचा असा दावा आहे की, हिटमनच्या या निवृत्तीमागील कारण बीसीसीआय आहे. असे बोलले जात आहे.
७ मे रोजी संध्याकाळी ७:३० वाजता रोहित शर्माकडून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यात आली. पण याआधी, बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली होती आणि बोर्ड नवीन कर्णधाराच्या नावावर विचरात होती. ही बातमी प्रसिद्ध होताच रोहितच्या निवृत्तीची घोषणा देखील झाली. अशा परिस्थितीत, अनेक चाहत्यांचा असा विश्वास आहे की बीसीसीआयचा हा निर्णय शर्माच्या निवृत्तीमागील खरे कारण आहे.
बीसीसीआयकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील काही डाव दाखवण्यात आले आहेत. यामध्ये रोहित म्हणत आहे की, तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणे ही स्वतःच अभिमानाची अशी गोष्ट आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी देखील इंस्टाग्रामवर पोस्ट करून रोहितचे निवृत्तीबद्दल अभिनंदन केले आहे. याशिवाय बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी देखील हिटमॅनला शुभेच्छा दिल्या आहेत.
इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआय आधीच दुसऱ्या भारतीय कर्णधाराच्या शोधात असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. तथापि, रोहित शर्माला हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याहकीयकडून आधी सांगण्यात आले की, वेळच सांगेल, परंतु तो निवृत्तीचा विचार देखील करत आहे हे कोणालाही माहिती नव्हते. त्याच्या निर्णयामुळे आता बीसीसीआय दुसऱ्या कर्णधाराच्या शोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे.