फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
First innings of Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore match : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबई यांच्या संघाने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बंगळुरूच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत मुंबई इंडियन्ससमोर वानखेडेच्या मैदानावर 222 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजचा सामना मुंबई इंडियन्सच्या संघासाठी महत्त्वाचा आहे कारण मागील तीन पराभवानंतर आज त्यांना घरच्या मैदानावर जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. मुंबईच्या संघामध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल झाला आहे यामध्ये रोहित शर्मा आणि जसप्रीत बुनराह या दोघांचे पुनरागमन झाले आहे.
बंगळुरूच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर संघाने पहिला विकेट लवकर गमावला. मुंबई इंडियन्सच्या संघाने फिल सॉल्टला त्याच्या दुसरा चेंडूवर ट्रेंट बोल्टने बाहेरचा रस्ता दाखवला. पण त्यानंतर संघाचा सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि देवदत्त पडिकल या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांना चांगलाच धुतलं. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ४२ चेंडूंमध्ये ६७ धावा केल्या यामध्ये त्याने दोन षटकार आणि आठ चौकार मारले. तर देवदत्त पडिकल याने २२ चेंडू मध्ये ३७ धावा केल्या, यामध्ये त्याने तीन षटकार आणि दोन चौकार ठोकले. लियोम लिविंगस्टोन याला दुसरा चेंडूवरच हार्दिक पांड्याने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
Innings Break!
Power-packed batting display from #RCB 💥
They post a solid target of 2️⃣2️⃣2️⃣ for the home side 🎯#MI‘s exciting chase on the other side ⌛️
Scorecard ▶ https://t.co/Arsodkwgqg#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/pyHCGnvO8X
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2025
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याने संघासाठी धुव्वादार फलंदाजी केली. रजतने ३२ चेंडूंमध्ये ६४ धावा केल्या यामध्ये त्याने ४ षटकार आणि ५ चौकार ठोकले. जितेश शर्माने संघासाठी १८ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. यामध्ये त्याने ४ षटकार आणि २ चौकार मारले.
आजच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली आहे. ट्रेंट बोल्टने संघासाठी ४ ओव्हरमध्ये ५७ धावा देत २ विकेट्स घेतले. तर हार्दिक पंड्याने देखील संघासाठी २ विकेट्सची कमाई केली. विघ्नेश पुथूरने संघासाठी या सामन्यात १ विकेट घेतला.
MI vs RCB : मुंबई इंडियन्स कमबॅक करणार का? हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर रोहित शर्माची बॅट या सीझनमध्ये शांत राहिली आहे, त्यामुळे आज मोठ्या धावसंख्येसमोर रोहित शर्मा कशी फलंदाजी करेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव दमदार फॉर्ममध्ये आहे त्यामुळे त्याच्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. विल जॅकसने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चांगली कामगिरी केली होती आजच्या सामन्यात त्याच्या खेळीवर चाहत्यांची नजर असेल. त्याचबरोबर तिलक वर्माला चालू सामन्यात रिटायर केले होते त्यामुळे आजची त्याची कामगिरी कशी असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.