RR vs LSG : राजस्थान रॉयल्स संघाचा कणा मोडला(फोटो-सोशल मिडिया)
RR vs LSG : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा १८ वा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. आता पर्यंत ३४ सामने पार पडले आहेत. तर आज ३५ आणि ३६ असे दोन सामने होणार आहेत. त्यातील ३६ व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने येणार आहेत. राजस्थान रॉयल्स संघाची आयपीएल २०२५ मधील आतापर्यंतची कामगिरी खूपच वाईट राहिली आहे. गुणतालिकेत आरआर आठव्या स्थानी आहे. १९ एप्रिल रोजी लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. त्यापूर्वीच आरआरसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कर्णधार संजू सॅमसन या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे.
खरंतर, लखनौविरुद्धच्या आरआर सामन्यात कर्णधार संजू सॅमसन खेळणे निश्चित नसल्याचे समजते. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करत असताना संजूला बरगडीला दुखापत झाली होती. यामुळे तो रिटायर हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला होता. या दुखापतीमुळे संजूच्या लखनौविरुद्ध खेळण्यावर शंका उपस्थित झाली आहे.
हेही वाचा : RCB Vs PBKS : अर्शदीप सिंग बनला पंजाबसाठी ‘किंग’, आयपीएलमध्ये रचला इतिहास..
राजस्थान रॉयल्स संघ संजूच्या स्कॅन रिपोर्टची वाट पाहत असल्याची माहिती आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शुक्रवारी सांगितले की, संजूकडून पोटात दुखत असल्याची तक्रार करण्यात आली होती. आम्ही स्कॅन केले आहे आणि आता अहवालाची वाट पाहत आहोत. स्कॅनच्या निकालांवर आधारित पुढील निर्णय घेण्यात येईल.
सामन्यानंतर त्याच्या दुखापतीबद्दल माहिती देताना सॅमसन म्हणाला की, ‘मला वाटते आता सर्व काही ठीक आहे. मी परत मैदनात उतरून फलंदाजी करण्यास तयार नव्हतो. आता सर्व काही ठीक आहे.’ तसेच राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांसाठी सॅमसनच्या स्थितीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
हेही वाचा : GT vs DC : अव्वल स्थानासाठी आज दिल्ली-गुजरात आमनेसामने; मोहम्मद सिराज, मिचेल स्टार्कवर असणार नजरा..
बुधवारी(१७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स (डीसी) विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान सॅमसनला दुखापत झाली होती. त्याने १९ चेंडूत ३१ धावांची जलद खेळी केली. त्यानंतर तो रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतला. त्याने विप्रराज निगमच्या चेंडूवर कट शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना त्याला बरगड्यांमध्ये वेदना जाणवून आल्या. फिजिओने त्याची तपासणी केली, परंतु पुढचा चेंडू खेळल्यानंतर सॅमसनला मैदान सदोउण जावे लागले. या सामन्यात राजस्थान रॉयल्सला सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.