पॅट कमीन्स(फोटो-सोशल मीडिया)
SA vs AUS : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना खेळवण्यात येत आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद २१२ धावा करू शकला. तर साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडे १०२ धावांची आघाडी आहे.
हेही वाचा : Ahmedabad plane crash ने क्रिकेट जगत शोकाकुल! Rohit Sharma सह इरफान पठाण झाले दुःखी, शेअर केली पोस्ट..
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २१२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी डगमगलेली दिसून आली. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका संघाने २२ षटकांत ४३ धावांच्या मोबदल्यात चार विकेट गमावल्या होत्या. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने दुसऱ्या दिवशी आपल्या गोलंदाजीने कहर केला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात त्याने कर्णधार टेम्बा बावुमाला बाद करून कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
पहिल्या दिवसाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेने ४३ धावा करून चार विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात, ऑस्ट्रेलियाला कर्णधार टेम्बा बावुमाच्या रूपात आफ्रिकेला मोठे यश मिळाले. त्याला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने बाहेरचा रस्ता दाखवला. या दरम्यान ५० वर्षांनंतर, लॉर्ड्सच्या मैदानावर एक मोठा पराक्रम घडला, जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने विरोधी संघाच्या कर्णधाराला आपला बळी बनवले. १९०९ मध्ये, मोती नोबलने दोन्ही डावात आर्ची मॅकलरेनला आपला शिकार बनवले होते. त्याच वेळी, १९७५ मध्ये, टोनी ग्रेगने इयान चॅपेलला माघारी पाठवले होते.
हेही वाचा : ‘हे ऐकून खूप धक्का बसला…’, Ahmedabad plane crash वर Harbhajan Singh ची भावुक प्रतिक्रिया..
५० वर्षांनंतर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ मध्ये पॅट कमिन्सने साऊथ आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला बाद करून या खास यादीत स्वतःला समाविष्ट करून घेतले. WTC २०२५ च्या जेतेपद सामन्यात, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमाने ८४ चेंडूंचा सामना करत ३६ धावा केल्या.
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
हेही वाचा : Ahmedabad plane crash ने क्रिकेट जगत शोकाकुल! Rohit Sharma सह इरफान पठाण झाले दुःखी, शेअर केली पोस्ट..
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.