कॅनडाचा TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय(फोटो-सोशल मीडिया)
SA vs CAN, ICC T20 World Cup 2026 : आज आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील नववा सामना कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात कॅनडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दक्षिण आफ्रिका संघ प्रथम फलंदाजी करतताना दिसणार आहे.
कॅनडाने २०२४ मध्ये पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकात भाग घेतला, जिथे त्यांनी आयर्लंडला हरवले, पण ते गट फेरीतून पुढे जाण्यात अपयशी ठरले. आजच्या सामन्यात त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाचे आव्हान असणार आहे. त्यामुळे कॅनडा संघाला जबाबदारीने खेळावे लागणार आहे. कॅनडा संघाची धुरा २३ वर्षीय दिलप्रीत सिंग बाजवाच्या खांद्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व एडन मार्कराम करत आहे.
हेही वाचा : ‘तो दररोज पारो बदलतो…’, हरभजनकडून हार्दिकचा ‘देवदास’ म्हणून उल्लेखावर आशीष नेहराची मजेशीर कॉमेंट; पहा Video
कॅनडाने टॉस जिंकल्यावर कर्णधार दिलप्रीत बाजवाने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “प्रथम गोलंदाजी करायला आवडेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या स्टेडियममध्ये खेळून आनंद होत आहे. आम्ही श्रीलंकेत दौऱ्यापूर्वी सराव केला. श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध खूप चांगले सराव सामने खेळलो. आमच्या संघात तीन वेगवान गोलंदाज आहेत. साद बिन झफर – डावखुरा फिरकी गोलंदाज, अंश पटेल – चायनामन गोलंदाज. आम्ही आधीच GT20 मध्ये मोठ्या खेळाडूंसोबत खेळलो आहोत. ही एक चांगली संधी आहे.”
टॉस गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम म्हणाला की, “खेळपट्टी खूप चांगली दिसत आहे. आशा आहे की आम्ही चांगली सुरुवात करू, एक मोठी धावसंख्या उभारू आणि गोलंदाजी करतानाही तोच वेग कायम ठेवू. गेल्या सहा महिन्यांत आम्हाला उपखंडात बरीच क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे आणि आता आम्ही विश्वचषक सुरू करण्यास खूप उत्सुक आहोत. साहजिकच, आमचे दीर्घकालीन ध्येय (गेल्या वेळच्या तुलनेत) एक पाऊल पुढे जाणे हे आहे. पण त्याआधी, आम्हाला गट फेरीत चांगली कामगिरी करून सुपर ८ आणि बाद फेरीच्या सामन्यांपर्यंत पोहोचण्याचा हक्क मिळवावा लागेल. सध्या आमचे लक्ष याच गोष्टीवर आहे.
हेही वाचा : SCO vs ITA,T20 World Cup 2026 : स्कॉटलंडने उडवला इटलीचा 73 धावांनी धुव्वा! मायकेल लीस्कची अष्टपैलू खेळी
कॅनडा प्लेइंग इलेव्हन: युवराज समरा, दिलप्रीत बाजवा (कर्णधार), नवनीत धालीवाल, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (डब्ल्यू), हर्ष ठाकरे, साद बिन जफर, जसकरण सिंग, दिलोन हेलिगर, कलीम सना, अंश पटेल
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: एडन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी






