धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर
धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काही गटांचे निकाल विशेष लक्षवेधी ठरले असून तेर आणि जवळा गटातील निकालांनी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.धाराशिव तालुक्यातील तेर गटातून अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी ७५९७ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेतली. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उबाठा गटाच्या किर्तीमाला महादेव खामकर यांना ५२३७ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांना केवळ १२५३ मतांवर समाधान मानावे लागले, त्यामुळे या गटात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
परंडा तालुक्यातील जवळा गटात अपक्ष उमेदवार धनंजय सावंत यांनी विजय मिळवला आहे. माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असलेल्या धनंजय सावंत यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर तब्बल २४०० मतांची आघाडी घेत विजय साकारला. या निकालामुळे परंडा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, दुपारी दीड वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार जिल्ह्यातील इतर अनेक गटांचे चित्रही स्पष्ट झाले आहे.
पारगाव येथून सविता तळेकर (शिंदेसेना) विजयी झाल्या आहेत. ढोकी गटातून उबाठाचे तीर्थराज घाडगे, तर ढोकी गणमधून अमर अनंतराव समुद्रे हे केवळ एका मताच्या फरकाने विजयी झाले, त्यामुळे हा निकाल चुरशीचा ठरला.
गोवर्धनवाडी गण : सुशील पांडुरंग काकडे
काक्रंबा : दयानंद शिंदे (भाजपा)
पळसप : अजित लाकाळ (शिंदेसेना)
पळसप गण : शामल विशाल पाटील
जागजी गण : पांडुरंग उमराव सावंत
इटकूर : अनंत लंगडे (शिंदेसेना)
इटकूर गण : नानासाहेब सांगळे (भाजपा)
मस्सा खंडेश्वरी : राजश्री वरपे (शिंदेसेना)
सरमकुंडी (वाशी) : प्रवीण गायकवाड
सिंदफळ (तुळजापूर) : शीतल ढाले (भाजपा)
जवळा (परंडा) : धनंजय सावंत
कोंड गट : शुभम भोसले
इर्ला गण : गोकर्णा कदम
कोंड गट : शीतल खांडेकर
तेर गण : जया नाईकवाडी
आळणी गण : सुरेखा गवाड
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चुरशीचे सामने पाहायला मिळाले असून काही गटांत अत्यल्प मतांच्या फरकाने निकाल लागल्याने मतदारांमध्ये उत्सुकता कायम आहे. उर्वरित निकालांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






