सॅम करन आणि महेंद्रसिंग धोनी(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : अखेर बीसीसीआयकडून स्तगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे. बीसीसीआयने सोमवारी आयपीएल २०२५ चे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. २५ मे रोजी खेळवण्यात येणारा फायनल सामना ३ जून रोजी खेळावण्यात येणार आहे. यापूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावामुळे ते एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले होते. आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे. सर्व संघ त्यांच्या परदेशी खेळाडूंना भारतात परत बोलावत असल्याचे चित्र आहे.
परदेशी खेळाडूंबद्दल बोलत असताना, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की, आम्ही परदेशी खेळाडूंशी खाजगीरित्या संवाद साधत आहोत. सर्व संघ आपापल्या खेळाडूंच्या संपर्कात असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. आम्हाला आशा आहे की बहुतेक खेळाडू हे आपापल्या संघात परत येतील. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले की सुधारित वेळापत्रक काल जाहीर केले आहे. ते परदेशी खेळाडूंच्या संपर्कात आहेत. यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. आमचा सामना २० मे रोजी होणार आहे त्यामुळे अजून बराच अवधी बाकी आहे.
भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात, इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून बीसीसीआयला पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचे सर्व खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी जणार आहेत. १७ मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होत आहे यात काही शंका नाही. याआधीच इंग्लंडचे खेळाडू भारतात येऊ लागतील. असे म्हटले आहे.
इंग्लंड २९ मे ते ३ जून दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यासाठी संघाची घोषणा देखील करण्यातआली आहे. या मालिकेसाठी फिट सॉल्टची निवड झालेली नाही. याचा अर्थ असा की तो पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसणार आहे. त्याच वेळी, गुजरात टायटन्सचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर १४ मे रोजी संघात सामील होणार असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा : मोहम्मद शामीने निवृत्तीच्या वृत्तांवर मीडियाला फटकारलं! म्हणाला – आजचा सर्वात खराब…
त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स आणि फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांचे देखील पुनरागमन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावानंतर हे दोन्ही खेळाडू मायदेशी परतले होते. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आयपीएल खेळवण्याचा निर्णय खेळाडूंच्या मनावर सोपवला आहे. म्हणजे आयपीएल २०२५ साठी भारतात परतण्याचा निर्णय त्याच्या हातात असणार आहे.