फोटो सौजन्य - सोशल मीडिया
शाकिब अल हसन : बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या वादामुळे शाकिब अल हसन त्या वेळेपासून प्रचंड चर्चेत आहे. भारतविरुद्ध झालेल्या कसोटी आणि T२० मालिकेमध्ये पराभवानंतर आता बांग्लादेशसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघ T२० विश्वचषक २०२४ चा उपविजेता संघ आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका हा संघ क्रिकेट विश्वातील एक मजबूत संघ मानला जातो. २१ ऑक्टोबरपासून ही कसोटी मालिका सुरू होत आहे. त्यासाठी दोन्ही संघांची घोषणाही करण्यात आली आहे. बांग्लादेश संघातही अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन संघाचा भाग आहे. शाकिबचा हा शेवटचा सामना असेल असे मानले जात आहे. परंतु शाकिब होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेमध्ये खेळू शकणार नाही असे वृत्त येत आहेत, यामध्ये किती सत्य आहे यावर एकदा नजर टाका.
दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेश दौरा असणार आहे, परंतु या सामन्यात शाकिबच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे बोलले जात आहे. शाकिब अल हसन बुधवारी रात्री दुबईला पोहोचला, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्याला बांग्लादेशला त्याच्या स्वतःच्या देशामध्ये जाण्यापासून रोखण्यात आले आहे. खरे तर बांग्लादेशमधील पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारविरोधात नुकत्याच झालेल्या हिंसक निदर्शनांमध्येही शाकिबचे नाव पुढे आले आहे. यादरम्यान त्याच्यावर अनेक आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून शाकिब देशात परतल्यास त्याला अटक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शाकिब अल हसन हा हसिना सरकारचा समर्थक आणि सदस्य आहे असे म्हंटले जात होते त्याचबरोबर त्यांचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले होते. याशिवाय ते खासदार म्हणूनही निवडून आले होते. जेव्हा त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला तेव्हा त्याच्या विरोधात मीरपूरमध्ये निदर्शने झाली, त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
शाकिब या कसोटीत खेळला आणि कोणतीही अनुचित घटना घडली तर त्याचा थेट परिणाम देशाच्या प्रतिमेवर होईल, अशी भीती बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे बोर्डही कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्याचे टाळत असून शाकिबचे निरोपाचा सामना खेळणे आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अशा स्थितीत शाकिबची क्रिकेट कारकीर्द वादांच्या भोवऱ्यात सापडली असून शेवटचा सामना खेळण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहू शकते.
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान लस्लाम, महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), जेक अली, मेहदी हसन मिराज. , तैजुल इस्लाम, नईम हसन, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.