शिवम दुबे : आज भारत विरुद्ध आयर्लंड (India vs Ireland) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नसाउ इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. T-20 विश्वचषक 2024 चा (T-20 World Cup 2024) भारताचा हा पहिला सामना असणार आहे. या सामन्यामध्ये भारताचा संघाचा यंदाच्या विश्वचषकासाठी नव्या खेळपट्टीवर कोणता नवा प्लॅन असणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे. भारताचा संघ या विश्वचषकात तीन साखळी सामने असणार आहेत. आयर्लंडचा संघ जरी जेतेपदाचा दावेदार नसला तरी त्याला हलक्यात घेणं नक्कीच भारताला महागात पडू शकते. अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकाची परिस्थिती, हवामान आणि खेळपट्टी आधीच आव्हानात्मक आहे. अशा स्थितीत भारतीय संघ पहिल्याच सामन्यापासून पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. (फोटो सौजन्य – BCCI)
[read_also content=”T-20 विश्वचषक 2024 च्या पहिला सामन्यासाठी भारताचा संघ सज्ज https://www.navarashtra.com/photos/india-team-ready-for-first-match-of-t-20-world-cup-2024-543041.html”]
न्यूयॉर्कची खेळपट्टी नवीन आहे त्याचबरोबर भारताच्या संघाला अमेरिकेत खेळण्याचा फारसा अनुभव नाही. एवढेच नव्हे तर अमेरिकेमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये खेळपट्टी फलंदाजांना त्रासदायक ठरली आहे. अशा स्थितीत भारतीय संघ आपल्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो. विशेषत: मधली-खालची फळी मजबूत करण्याचा प्रयत्न असेल, त्यासाठी शिवम दुबेचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर आणखी कोणत्या फलंदाजांना प्लेइंग ११ मध्ये संधी हे पाहणे महत्वाचे ठरेल.
शिवम दुबेकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष?
भारतीय संघासाठी शिवम दुबे नक्कीच गेम चेंजर ठरू शकतो. यंदाच्या आयपीएल 2024च्या सीझनमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी दमदार कामगिरी केली. शिवम दुबेचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यासाठी भारताला खूप कठोर निर्णय घ्यावा लागेल. यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माला त्याचा नियमित सलामीचा जोडीदार यशस्वी जैस्वालला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करावे लागू शकते. यशस्वी जैस्वालच्या जागी विराट कोहलीला सलामी दिली जाऊ शकते. याचा अर्थ असाही होईल की पॉवरप्लेमध्ये वेगवान फलंदाजीची जबाबदारी पूर्णपणे रोहितवर पडेल कारण विराटला अनेकदा एका टोकाला उभे राहून लांब डाव खेळणे आवडते.