Kabaddi Tournament : अमर हिंदचा दणदणीत विजय; सेजल कांबळेची चमक, जय भारत-यशचीही आगेकूच
महिला गटात अमर हिंद मंडळाने भारतमाता महिला संघाचा 45-30 असा 15 गुणांनी पराभव केला. अमर हिंदकडून सेजल कांबळेने चढाईत, तर सलोनी नाक्तीने पकडीत प्रभावी कामगिरी केली. भारतमातेकडून पायल कांचनने चढाईत, तर दृष्टी कुंभारने पकडीत चांगला खेळ केला. मात्र, अमर हिंदने सामन्यावर वर्चस्व राखत विजय साकारला.
कुमार गटात जय भारत सेवा मंडळाने आकांक्षा क्रीडा मंडळाचा 36-24 असा 12 गुणांनी पराभव केला. जय भारतकडून आर्यन बावडेकरने चढाईत, तर तन्मय बावकरने पकडीत चमक दाखवली. आकांक्षाकडून ओमकार पवार आणि स्वप्निल पाटील यांनी अनुक्रमे चढाई व पकडीत योगदान दिले. याच गटात यश क्रीडा मंडळाने पंचगंगा सेवा मंडळावर ३५-३१ अशी चार गुणांनी मात केली.
Its Show Time : नीरज गोयात विरुद्ध अँथनी पेटिस असा रंगणार ऐतिहासिक Boxing Match!
महिला गटातील दुसऱ्या सामन्यात विश्वशांती क्रीडा मंडळाने गोल्फादेवी प्रतिष्ठानचा 32-25 असा सात गुणांनी पराभव केला. विश्वशांतीकडून रोझी डिसोझाने चढाईत, तर शितल मेरांडेने पकडीत चांगली कामगिरी केली. गोल्फादेवी प्रतिष्ठानकडून रचना म्हात्रेने चढाईत, तर जागृती घोसाळकरने पकडीत योगदान दिले.
व्यावसायिक गटात बेस्ट संघाने टीबीएमवर 36-31 अशी पाच गुणांनी मात केली. बेस्टकडून सुरेश पाटीलने चढाईत, तर राहुल परबने पकडीत प्रभावी खेळ केला. टीबीएमकडून पारस शिर्के आणि विकास जोगले यांनी अनुक्रमे चढाई व पकडीत प्रयत्न केले.
दुसऱ्या सामन्यात पी. डी. हिंदुजा संघाने आरबीएससीचा 45-37 असा आठ गुणांनी पराभव केला. या निकालांमुळे शिवनेरी कबड्डी महोत्सवातील कुमार, महिला आणि व्यावसायिक गटांतील स्पर्धेची रंगत वाढली आहे.
Ans: अमर हिंद मंडळाने भारतमाता महिला संघाचा 45-30 असा पराभव केला.
Ans: जय भारत सेवा मंडळाने आकांक्षा क्रीडा मंडळाचा, तर यश क्रीडा मंडळाने पंचगंगा सेवा मंडळाचा पराभव केला.
Ans: बेस्ट, पी. डी. हिंदुजा आणि मुंबई पोस्टल या संघांनी आपापल्या सामन्यांत विजय मिळवला.






