फोटो सौजन्य - BCCI
शुभमन गिल : आयपीएल 2025 च्या 18 व्या सिझनचा आज 55 वा सामना खेळवला जाणार आहे, सध्या स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. त्यानंतर भारताचा संघ इंग्लड दौऱ्यावर असणार आहे. इंडीयन प्रिमियर लिग 2025 च्या या सिझनमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सची कमान मागील 2 वर्षापासुन शुभमन गिलच्या नेतृत्वात आहे. शुभमन गिलची टीम गुजरात टायटन्स आयपीएल २०२५ मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. याशिवाय कर्णधार शुभमन गिल देखील शानदार फलंदाजी करत आहे. त्याच वेळी, आयपीएल २०२५ नंतर, इंग्लंड दौऱ्यावर शुभमन गिलला टीम इंडियामध्ये मोठी जबाबदारी मिळणार असे म्हंटले जात आहे.
आयपीएलनंतर टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयपीएलनंतर इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. याआधी असे वृत्त येत होते की, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेतून बाहेर पडू शकतो. टीम इंडियाच्या सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “आम्हाला असा खेळाडू हवा आहे जो पाचही कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असेल आणि त्याला उपकर्णधाराची भूमिका देण्यात यावी. बुमराह पाचही सामने खेळणार नाही, म्हणून आम्हाला वेगवेगळ्या सामन्यांसाठी वेगवेगळे उपकर्णधार नियुक्त करायचे नाहीत. कर्णधार आणि उपकर्णधार खात्री बाळगून पाचही कसोटी खेळले तर बरे होईल.”
Shubman Gill has emerged as a Strong Candidate for the Test Leadership role in the New WTC Cycle. [Sahil Malhotra from TOI] pic.twitter.com/TfUjFvHAnK
— Johns. (@CricCrazyJohns) May 5, 2025
वास्तविक, जसप्रीत बुमराहला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान दुखापत झाली होती, ज्यामुळे तो २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळू शकला नाही. दुखापतीमुळे बुमराह आयपीएल २०२५ च्या पहिल्या काही सामन्यांनाही मुकला. बीसीसीआयने अजुनपर्यत संघाची घोषणा केली नाही. यामध्ये रोहित शर्मा संघाची कमान सांभाळणार आहे असे म्हंटले जात आहे.
आता या दौऱ्यासाठी उपकर्णधार म्हणून शुभमन गिलला एक चांगला पर्याय मानले जात आहे. सध्या, आयपीएलमध्येही गिलची चमकदार कर्णधारपदाची झलक दिसून येत आहे. गिलच्या नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने सीझन-१८ मध्ये आतापर्यंत १० सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने ७ जिंकले आहेत आणि ३ गमावले आहेत. आयपीएलच्या चालु सिझनमध्ये अनेक खेळाडूनी संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे त्याचबरोबर बीसीसीआयने टी-20 संघाच्या कराराची घोषणा करण्यात आली होती आता कसोटी संघामध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.