अक्षर पटेल आणि पॅट कमीन्स (फोटो-सोशल मीडिया)
DC vs SRH : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ५४ सामने खेळवण्यात आले आहेत. आज ५ मे रोजी ५५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबादसाठी हा सामना खूप जास्त महत्त्वाचा आहे. हा सामना संघाचा स्पर्धेतील आगामी प्रवास ठरवणार आहे. हा सामना हैदराबादसाठी करा किंवा मरो असा असणार आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामात हैदराबादने आतापर्यंत १० सामने असून त्यापैकी त्यांनी ३ सामने जिंकले आहेत आणि ७ सामने गमवावे लागले आहे. हा संघ पॉइंट टेबलमध्ये 9 व्या स्थानावर विराजमान आहे, तर दिल्ली कॅपिटल्सने 10 पैकी 6 सामने जिंकले असून 4 सामने गमावले आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये डीसी सहाव्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा : LSG vs PBKS : ‘त्याच्यात MS Dhoni चे गुण, तोही तसाच..’, IPL मध्ये Matthew Hayden कडून नव्या धोनीचा शोध..
हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्टी संतुलित मानली जात आहे. जी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही समान संधी उपलब्ध करून देते. तथापि, आकडेवारीवरून असे स्पष्ट होते की, या मैदानावर फलंदाजी करणे काहीसे सोपे जाता आहे. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना जास्त स्विंग किंवा बाउन्ससाठी मदत मिळत नाही, परंतु खेळ जसजसा पुढे जात राहतो तसतसे ते लयीत येत राहतात. येथे पहिल्या डावात सरासरी धावसंख्या १६३ राहिली आहे. नाणेफेक जिंकणारा संघ सहसा प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देत आल आहे.
सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या दोघांमध्ये एकूण २५ सामने खेळवण्यात आले आहेत, ज्यामध्ये दिल्लीने १२ सामने जिंकले आहेत, तर हैदराबादने १३ सामने आपल्या नावे केले आहेत. याचा अर्थ हैदराबादचा दिल्लीवर वरचष्मा दिसून येतो.
प्रेक्षकांना संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दिवसा तापमान नक्कीच थोडे जास्त असणार आहे, पण संध्याकाळपर्यंत हवामान आल्हाददायक होणार आहे. दवाची भूमिका देखील मर्यादित असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे दोन्ही संघांना संतुलित परिस्थितीत खेळण्याची संधी मिळेल, असे सांगण्यात आले आहे.
दिल्ली कॅपिटल्स : फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), विपराज निगम, ट्रिस्टन स्टब्स, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, करुण नायर, दुष्मंथा चमीरा, मुकेश कुमार.
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी.