शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु आहे. यामध्ये भारत आणि इंग्लंड हे ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहेत. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात खेळला जात आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एजबॅस्टनच्या मैदानातील ऐतिहासिक विजयासह लीड्सच्या मैदानातील पराभावची परतफेड करत ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. शुभमन गिलने बर्मिंगहॅमच्या मैदानात कसोटी कर्णधाराच्या रुपात विजयाचे खाते उघडले. पण तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकण्यात तो पुन्हा अपयशी ठरला. टॉस वेळी सलग तिसऱ्यांदा त्याच्या पदरी निराशा आली.
यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या नावे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून सलग सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेला. गिलने लॉर्ड्सवर टॉस गमावताच टीम इंडियाच्या नावे आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा नकोसा वर्ल्ड नावे झाला आहे. ३१ जानेवारी २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत भारतीय संघाने टी-२०, वनडे आणि कसोटीत मिळून सलग १३ वेळा टॉस गमावला आहे. याआधी हा रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या नावे होता. कॅरेबियन संघाने २ फेब्रुवारी १९९९ ते २१ एप्रिल १९९९ या कालावधीत सलग १२ वेळा टॉस गमावला होता.
संघ किती वेळा टॉस गमावला केव्हा कर्णधार
भारत १३ ३१ जानेवारी ते १० जुलै २०२५ रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल
वेस्ट इंडिज १२ २ फेब्रुवारी १९९९ ते २१ एप्रिल १९९९ जेम्स अडम्स, ब्रायन लारा आणि कार्ल हुपर
इंग्लंड ११ १७ डिसेंबर २०२२ ते १२ मार्च २०२३ जोस बटलर आणि बेन स्टोक्स
न्यूझीलंड १० १६ फेब्रुवारी १९७२ ते ७ जून १९७३ बेव्हन कॉगडों, ग्रॅहाम डाउलिंग
हेही वाचा : IND vs ENG : आऊट की नाॅट आऊट? जो रुट घेतलेला कॅच वादात! पंचांवर फसवणुकीचा आरोप
भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. लीड्स कसोटीनंतर या सामन्यात जसप्रीत बुमराहने जोरदार पुनरागमन केले आहे. जसप्रीत बुमराहने लॉर्ड्स कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेऊन इंग्लंड संघाचे कंबरडे मोडले आणि इंग्लंडला ३८७ धावांवर रोखण्यात मोठी भूमिका बजावली आहे. या कामगिरीसह बुमराहने लॉर्ड्स येथे पाच विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे. तोपरदेशात एका डावात सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. जसप्रीत बुमराहने घराबाहेर १३ वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने कपिल देवला पिछाडीवर टाकून ही खास कामगिरी केली आहे. कपिल देवने घराबाहेर १२ वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याची किमया साधली होती. आता घराबाहेर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा हा विक्रम बुमराहच्या नावावर जमा झाला आहे.






