फोटो सौजन्य – X (JioHotstar)
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये तिसऱ्या कसोटीचे दोन दिवस पार पडले आहेत. यामध्ये भारताच्या संघाने इंग्लडच्या संघाला 387 धावांवर रोखले. भारताचा संघ सध्या फलंदाजी करत आहे. यामध्ये भारताच्या संघाने दुसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर 3 विकेट्स गमावुन 145 धावा केल्या आहेत. या दुसऱ्या दिनी करुन नायर याचा कॅच जो रुटने घेतला आणि सध्या हा कॅट वादात आहे. सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात या संदर्भात चर्चा सुरु आहेत. याचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकीकडे ड्यूक बॉलवरून वाद सुरू आहे, तर दुसरीकडे आणखी एका नवीन वादाला जन्म मिळाला आहे. लॉर्ड्सवर करुण नायरला झेल देऊन जो रूटने विश्वविक्रम केला. आता या झेलवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. इंग्लंडने पहिल्या डावात ३८७ धावा केल्या. त्यानंतर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाने ३ विकेट गमावून १४५ धावा केल्या.
दुसऱ्या दिवशी करुण नायरने क्रीजवर टिकून राहण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, तो आपला डाव लांबवू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात करुण नायर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने डावाच्या सुरुवातीला खूप संयम दाखवला. तथापि, बेन स्टोक्सच्या एका चेंडूने त्याला फसवले. बेन स्टोक्सने भारताविरुद्ध २१ वे षटक टाकले. या षटकातील दुसरा चेंडू करुणच्या बॅटच्या काठावरुन स्लिपकडे गेला, जिथे जो रूटने डायव्ह केला आणि तो झेलला.
Joe Root goes past Rahul Dravid’s record for Test catches in style! #INDvsENGpic.twitter.com/RCsl2VyFeA — Satish Acharya (@satishacharya) July 11, 2025
यानंतर, रिव्ह्यूमध्ये असे दिसून आले की चेंडू जमिनीला स्पर्श करत होता. तिसऱ्या पंचांनी हा झेल कायदेशीर मानला. त्यांच्या मते, जेव्हा चेंडू जमिनीवर पडला तेव्हा रूटची बोटे त्याखाली होती. त्यामुळे करुण नायरचा डाव संपला. नायरने ६२ चेंडूत ४० धावा केल्या.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
आता रूटच्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे, ज्यामध्ये चाहत्यांनी पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जो रूटवर फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला होता. सोशल मीडियावरील चाहत्यांनी या कॅचला चुकीचे म्हटले. सोशल मिडीयावर चाहत्यांनी असेही म्हटले की रूटने खरे सांगुन क्रिकेटची भावना दाखवायला हवी होती.






