फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद पहिल्या डावाचा अहवाल : अहमदाबाद मैदानावर सध्या गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने पहिले फलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादसमोर 225 धावांचे लक्ष्य उभे केले. आजच्या सामन्यात आणखी एकदा गुजरातचे सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी पॉवर प्लेमध्ये कहर केला. आजच्या सामान्यांच्या पहिल्या डावांमध्ये खेळाडूंची कशी कामगिरी राहिली यावर एकदा नजर टाका.
गुजरात टायटन्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर साई सुदर्शन आणि शुभमन गिल याने संघाला आणखी एकदा धमाकेदार सुरुवात करून दिली. साई सुदर्शनने आजच्या सामन्यात २३ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या यामध्ये त्याने ९ चौकार ठोकले. शुभमन गिलने आणखी एकदा क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केले आहे. शुभमन गिल याने आणखी एकदा प्रभावशाली खेळी खेळली. आजच्या सामन्यात शुभमन गिल याने आज ३८ चेंडूंमध्ये ७६ धावा केल्या. यामध्ये त्याने २ षटकार आणि १० चौकार मारले त्यानंतर तो धावबाद झाला. सध्या त्याची विकेटही वादग्रस्त राहिली मैदान सोडल्यानंतर तो चौथ्या अंपायरसोबत वाद घालताना दिसला.
Innings break!
Fifties to skipper Shubman Gill and Jos Buttler power @gujarat_titans to a total of 224/6 💥
Will #SRH chase it down? 🤔
Scorecard ▶ https://t.co/u5fH4jQrSI#TATAIPL | #GTvSRH | @gujarat_titans pic.twitter.com/zzOPQ1ZKzJ
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2025
जोस बटलर याने आज संघासाठी कमालीचा खेळ दाखवला. आजच्या सामन्यात त्याने ३७ चेंडूंमध्ये ६४ धावा केल्या, यामध्ये त्याने ४ षटकार आणि ३ चौकार मारले. या अर्धशतकसह जोस बटलर याने संघासाठी या सीझनचे पाचवे अर्धशतक नावावर केले आहे. त्याचबरोबर त्याने आज आयपीएलमधील ४००० धावा पूर्ण केल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदर आज फलंदाजीला आला होता, त्याने संघासाठी १६ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या. शाहरुख खान शेवटच्या काही ओव्हरमध्ये फलंदाजीला आला आणि त्याने २ चेंडू खेळले यामध्ये त्यांने ६ धावा केल्या आणि नाबाद राहिला.
माजी वेगवान गोलंदाज एस श्रीशांतवर 3 वर्षांची बंदी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर आज जयदेव उनाडकट याला संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने आज संघासाठी ३ विकेट्सची कमाई केली. उनाडकटने आज वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतीया आणि राशिद खान याला बाहेरचा रस्ता दाखवला. पॅट कमिन्स याने आज संघासाठी १ विकेट घेतला तर झिशान अन्सारी याने देखील संघाला एक विकेट मिळवून दिला. हैदराबादसमोर आजच्या सामन्यात २२५ चे लक्ष्य असणार आहे त्यामुळे आजच्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे.