दक्षिण आफ्रिकेचा 260 धावांवर डाव घोषित(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SA 2nd Test Match, Day 4 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दूसरा कसोटी सामना बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने टीम इंडियासमोर विजयासाठी 549 धावांचे लक्ष्य दिले आहे. चौथ्या दिवसाच्या खेळात फक्त काही षटके बाकी आहेत. दक्षिण आफ्रिकेने आपला डाव 260/5 धावांवर घोषित केला असून भारतासमोर 549 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात ट्रिस्टन स्टब्सने सर्वाधिक 94 धावा केल्या आहेत. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघ बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 549 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली असून भारताची सुरुवात खराब झाली आहे. भारताची सलामी जोडी केएल राहुल 6 आणि जयस्वाल 13 धावा करून बाद झाले. आता मैदानावर साई सुदर्शन आणि कुलदीप यादव खेळत आहेत.
हेही वाचा : भारतीय संघाची आनंदाची बातमी! या दिनी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या करणार कमबॅक, वाचा सविस्तर
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाई करत ४८९ धावा उभ्या केल्या होत्या. प्रतिउत्तरात भातीय संघाला सर्वबाद २०१ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने २८८ धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विनानुकसान २६ धावा करत ३१४ धावांची आघाडी घेतळी होती. सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने 5 बाद 260 धावांवर डाव घोषित केला. चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर एडेन मार्कराम (१२) आणि रायन रिकेल्टन (१३) क्रीजवर यांनी 26 धावांपासून पुढे खेळयला सुरुवाट केली. एडन मार्करामने 29 धावा करून तर रायन रिकेल्टन 35 धावा करून बाद झाला. तर ट्रिस्टन स्टब्स 94 धावा, टेम्बा बावुमा 3 धावा, टोनी डी झोर्झी 49 धावा करून बाद झाले तर विआन मुल्डर 35 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स तर वॉशिंग्टन सुंदरने 1 विकेट्स घेतली. भारताला विजयासाठी एक दिवस शिल्लक असून 549 धावांचे टार्गेट आहे. ही मालिका भारताल जिंकणे गरजेचे आहे अन्यथा मालिका गमवावी लागणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघाची प्लेइंग 11 :
एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जॅन्सन, सेनुरान मुथुसामी, सायमन हार्मर आणि केशव महाराज
भारतीय संघाची प्लेइंग 11 :
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज






