फोटो सौजन्य - X
South Asian Athletics Championships : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सगळ्याच भारतीयांचा राग मस्तकात गेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर देशवासीयांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहे. सध्या भारतामध्ये आयपीएल सुरु आहे, झालेल्या हल्ल्यामुळं सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यांमध्ये काल कोणत्याही प्रकारची आतिषबाजी आणि चिअरलीडर ठेवण्यात आले नव्हते हा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. त्याचबरोबर कालच्या सामन्यांमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंनी त्यांच्या हातावर काळ्या पट्ट्या हल्ल्यात जीव गमावलेल्या लोकांसाठी श्रद्धांजली म्हणून वाहिली आहे.
हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांनी त्यांचा जीव गमावला आहे त्याचबरोबर १७ लोक अजूनही जखमी झाले आहेत. त्यामुळे भारतीयांचे मत आहे की पाकिस्तानकडून हा झालेल्या हल्ल्याचा बदल घेण्यात यावा. आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स आयोजित करण्यात आली होती, पण दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
वीरेंद्र सेहवाग इशान किशनवर नाराज, त्याचा प्रामाणिकपणा आवडला नाही; म्हणाला- पंचही पैसे…
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी कोणतीही चूक न करता २८ पर्यटकांची हत्या केली. त्याच वेळी, सुमारे १७ लोक अजूनही रुग्णालयात त्यांचे प्राण वाचवण्यासाठी झगडत आहेत. या हल्ल्यामुळे जूनमध्ये होणारी स्पर्धा आता पुढे ढकलण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात येऊ शकते.
पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ही स्पर्धा जूनमध्ये होणार होती. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भूतानचे खेळाडू आधीच रांचीला पोहोचले होते आणि त्यांनी सरावही सुरू केला होता. तथापि, आता ही स्पर्धा कोणत्या तारखेला आयोजित केली जाईल याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. यापूर्वी ही स्पर्धा ३ ते ५ मे दरम्यान खेळवण्यात येणार होती, परंतु नंतर पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळण्यास विलंब झाल्यामुळे स्पर्धा पुढे ढकलावी लागली. ही स्पर्धा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणार होती, परंतु काही आठवड्यांपूर्वी ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली.
🚨#Breaking | Athletics Federation of India (AFI) President Bahadur Singh Sagoo explains why the South Asian Senior Athletics Championships are being rescheduled.
👉Rains and a potential clash of schedule with the Asian Championships were mentioned as the reasons.
— The Bridge (@the_bridge_in) April 24, 2025
अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बहादूर सिंह सांगो यांनी देखील यासंदर्भात जाहीरपणे सांगितले आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, आपण जर एवढे चांगली स्पर्धा आयोजित करत आहोत पण पावसाची शक्यता त्यावेळेमध्ये जास्त आहे त्यामुळे आम्ही ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.