कुलदीप यादव खेळणार की नाही?
२३ ऑगस्टपासून भारत-श्रीलंका कसोटी सुरू
कुलदीप यादवच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टेस्ट सिरिजमध्ये भारताची १-० आघाडी
India Vs Sri Lanka Tets Match Updates: येत्या २३ ऑगस्टपासून भारत अन् श्रीलंका यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ कोलंबोत दुसरा सामना खेळण्यासाठी दाखल झाला आहे. या टेस्ट सिरिजमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान २३ तारखेच्या सामन्यात प्लेइंग ११ मध्ये कुलदीप यादवला संधी मिळणार का हे पहावे लागणार आहे. कुलदीप यादवच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोलंबोत दाखल झाल्यानंतर भारतीय संघाने २१ ऑगस्ट रोजी जोरदार सराव केला. पहिल्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करू शकलेल्या कुलदीप यादवच्या प्लेइंग-११ मधील स्थानाबाबत चर्चा रंगली होती. यावर भारताचे स्पिन गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देत सर्व शंका दूर केल्या आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात स्पिनर कुलदीप यादवने २५ ओव्हर्स गोलंदाजी केली होती. त्याने २५ ओव्हर्समध्ये १०३ रन्स देत केवळ १ विकेट घेतली होती. तर दुसरीकडे मानव सुथार आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी १० आणि ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे कुलदीप यादव पुढील सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
‘एखाद्या सामन्यावरून एखाद्या खेळाडूची गुणवत्ता त्याची कामगिरीचे मोजमाप केले जाऊ शकत नाही. गॉलमधील कसोटीत त्याने भारताला हवा तास खेळ करण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला’, असे फिरकीपटू प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी म्हटले आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १६५ धावांनी जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथील ऐतिहासिक सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर रंगणार आहे.
श्रीलंका क्रिकेट संघ: लाहिरू उदारा, कामिल मिशारा, पसिंदु सूर्याबंदारा, कामिंदू मेंडिस (उपकर्णधार), धनंजया डी सिल्वा (कर्णधार), साहन अराचिगे, सोनल दिनुशा, निरोशन डिकवेला, केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, मिलन रत्नायके, लाहिरू कुमारा, असिता फर्नांडो, विश्वा फर्नांडो.
IND Vs SL Pitch Report: कोलंबोत Team India आग लावणार; कसे असणार पीच? श्रीलंकेची दाणादाण निश्चित
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीसाठी भारताचा संघ : शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी.






