फोटो सौजन्य - KolkataKnightRiders सोशल मीडिया
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad first innings report : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराइझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्याची पहिली इनिंग सुरु झाली आहे. दोन्ही संघाचा आज चौथा सामना आहे या सामन्यांमध्ये हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये कोलकाता नाईट राइडर्सने पहिले फलंदाजी करत २०१ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. केकेआरची या सामन्यात सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाने पहिल्या दोन सलामीवीर फलंदाजांचे विकेट लवकर गमावले.
या सामन्यात कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाने ६ विकेट्स गमावून २०० धावा केल्या. यामध्ये संपूर्ण सामन्यात कशाप्रकारे खेळाडूंची कामगिरी राहिली यावर एकदा नजर टाका.
कोलकाता नाईट राइडर्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर क्विंटन डी कॅाकने फक्त १ धावा करुन बाद झाला. तर सुनील नरेनने संघासाठी ७ चेंडुमध्ये ७ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने संघासाठी २७ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या. तर अंगकृष रघुवंशी याने संघासाठी अर्धशतकीय खेळी खेळली. अंगकृष रघुवंशी याने संघासाठी ३२ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. त्यानंतर रिंकू सिंह आणि वेंकटेश अय्यरने संघासाठी कमालीची फलंदाजी करून दाखवली. या सामन्यात वेंकटेश अय्यरने संघासाठी २९ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या तर रिंकू सिंगने संघासाठी १७ चेंडूंमध्ये ३२ धावा करून नाबाद राहिला.
Innings Break!
With a scintillating final flourish, #KKR rocket to 2⃣0⃣0⃣ / 6⃣ after 20 overs 🔥
Stay tuned for #SRH‘s chase ⌛
Updates ▶ https://t.co/jahSPzdeys#TATAIPL | #KKRvSRH | @KKRiders pic.twitter.com/O8hEFE7BGV
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2025
सनराइझर्स हैदराबाद संघाच्या गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर मोहम्मद शमीने संघाला १ विकेट मिळवून दिली. शमीने सुनील नरेनला बाहेरचा रस्ता दाखवला. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने संघाला पहिला विकेट मिळवून दिला यामध्ये कमिन्सने क्विंटन डी कॉकने बाहेरचा रस्ता दाखवला, आणि संघासाठी महत्वाचा विकेट घेतला. झीशान अन्सारीने संघासाठी महत्वाचा कोलकाता नाईट राइडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा विकेट घेतला आणि टीमला महत्वाचा विकेट मिळवून दिला.
KKR vs SRH : रिंकूने पूर्ण केलं खास अर्धशतक! संपूर्ण संघाने मिठी मारली आणि केलं खास सेलिब्रेशन
कमिंडू मेंडिसने संघासाठी अर्धशतक झळकावणारा अंगकृष रघुवंशी याला बाहेरचा रस्ता दाखवला त्याने टीमला मजबूत स्थितीत उभे केले होते. हर्षल पटेलने वेंकटेश अय्यरला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याने संघासाठी ६० धावा केल्या जर तो टाकून राहिला असता तर कोलकाताच्या संघाने २०० चा आकडा पार केला असता.
आजच्या सामन्यांमध्ये अभिषेक श्रमावर चाहत्यांची नजर असणार आहे. मागील काही सामान्यांमध तो विशेष कामगिरी करू शकला नाही. आजच्या सामन्यांमध्ये हैदराबादचा संघ कोणत्याही स्थितीत विजय मिळवण्याच्या इराद्यात आहे, कारण मागील दोन सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे.