T20 World Cup 2024 AUS vs NAM : ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया यांच्यातील T20 विश्वचषक 2024 च्या 24 व्या सामन्यात, ऑस्ट्रेलियाने नामिबियाचा 9 गडी राखून पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने सलग तिसरा सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नामिबियाचा संपूर्ण संघ केवळ 72 धावांमध्ये गारद झाला.
सुपर-8 मध्ये सहजरित्या एंट्री
अवघे 72 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने अवघी 1 विकेट गमावून सहज 73 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने संघाची कमान हातात घेत सहजरित्या हे लक्ष्य पार केले. ट्रेविस हेड आणि मिचेल मार्शने दोघांनी 2 ऱ्या विकेटसाठी भागीदारी करीत 73 धावांचे लक्ष्य पार केले. या विजयाने ऑस्ट्रेलियाची सुपर-8 मध्ये सहजरित्या एंट्री झाली आहे.
अॅडम जंपाने घेतल्या सर्वाधिक विकेट
ऑस्ट्रेलियाकडून अॅडम जंपाने सर्वाधिक विकेट घेतल्या, जम्पा 4 विकेट घेण्यात यशस्वी ठरला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने 1 गडी गमावून लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरने 20 आणि ट्रॅव्हिस हेडने 34 धावा केल्या. यानंतर मिचेल मार्शने 18 धावा करत संघाला विजयाकडे नेले. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य अवघ्या 5.4 षटकांत पूर्ण केले.
नामिबिया (प्लेइंग इलेव्हन) : निकोलस डेव्हाईन, मायकेल व्हॅन लिंजेन, जॅन फ्रिलिंक, गेर्हार्ड इरास्मस (सी), जेजे स्मित, झेन ग्रीन (विकेटकीपर), डेव्हिड विसे, रुबेन ट्रंपेलमन, बर्नार्ड स्कोल्ट्ज, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन) : ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (क), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.