Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! T20 World Cup 2026 च्या स्पर्धेची तारीख आली समोर; अंतिम सामना अहमदाबादमध्ये?

T20 World Cup 2026 च्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत! भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबोमध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 09, 2025 | 09:20 PM
मोठी बातमी! T20 World Cup 2026 च्या स्पर्धेची तारीख आली समोर; अंतिम सामना अहमदाबादमध्ये?
Follow Us
Close
Follow Us:
  • T20 World Cup 2026 च्या स्पर्धेची तारीख आली समोर
  • अंतिम सामना अहमदाबादमध्ये?
  • आतापर्यंत ‘हे’ 15 संघ पात्र ठरले
T20 World Cup 2026 Schedule:  आशिया कप 2025 ची (Asia Cup 2025) तयारी सुरू असतानाच आयसीसीकडून (ICC) एक मोठी बातमी येत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026) संभाव्य तारखा समोर आल्या आहेत. या स्पर्धेचे यजमानपद भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्याकडे असून, यामध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत.

7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान स्पर्धेचे आयोजन?

2026 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकचे सामने भारत आणि श्रीलंकेत होतील. अद्याप या स्पर्धेचे वेळापत्रक किंवा सामने कुठे होणार हे जाहीर झालेले नाही, मात्र क्रिकइन्फोच्या एका रिपोर्टनुसार, या स्पर्धेचे आयोजन 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण एक महिना क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल आणि 8 मार्चला या स्पर्धेचा नवा विजेता मिळेल. विशेष म्हणजे, भारतानेच 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून टी-20 विश्वचषकचे विजेतेपद पटकावले होते.

Next year’s men’s T20 World Cup is likely to take place from February 7 to March 8 in India and Sri Lanka, with the final to be held in Ahmedabad or Colombo Full story: https://t.co/LImYpNQBGU pic.twitter.com/ZdkU91alcs — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 9, 2025

पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत?

दरम्यान, पाकिस्तानचा संघ आपले सर्व सामने श्रीलंकेतच खेळेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. अंतिम सामन्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, पण तो अहमदाबाद किंवा कोलंबोमध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा संघ अंतिम सामन्यात पोहोचतो की नाही, यावर अंतिम स्थळाचा निर्णय अवलंबून असू शकतो. आयसीसीकडून लवकरच तारखांना अंतिम स्वरूप दिले जाईल आणि सहभागी संघांच्या बोर्डांना याची माहिती दिली जाईल असेही समजते.

Suryakumar Yadav: ‘टीम इंडियाला नंबर 1 कोणी म्हटले?’ पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या प्रश्नाने खळबळ

असा असेल स्पर्धेचा फॉरमॅट

2024 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकप्रमाणेच 2026 च्या स्पर्धेतही 20 संघ सहभागी होतील. या संघांना प्रत्येकी 5 च्या गटात विभागले जाईल. एकूण चार गट असतील. प्रत्येक गटातील टॉप 2 संघ सुपर एटमध्ये पोहोचतील. त्यानंतर चार संघांमध्ये सेमीफायनल होईल आणि त्यातील विजेत्या संघात अंतिम सामना रंगेल.

आतापर्यंत ‘हे’ 15 संघ पात्र ठरले

टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सहभागी होणाऱ्या 20 संघांपैकी 15 संघ पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, नेदरलँड्स आणि इटली या संघांचा समावेश आहे. उर्वरित पाच संघांपैकी दोन आफ्रिका पात्र फेरीत तर तीन आशिया आणि पूर्व आशिया-पॅसिफिक पात्र फेरीत निवडले जातील.

Web Title: T20 world cup 2026 schedule dates ahmedabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 09:20 PM

Topics:  

  • Ahemdabad
  • Asia cup 2025
  • ICC
  • india
  • Sports News
  • Sri Lanka
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Dharashiv News: वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षक रंगेहात जेरबंद
1

Dharashiv News: वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षक रंगेहात जेरबंद

IPL 2026 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा! Team India ‘या’ देशाच्या दौऱ्यावर; मालिकेचे वेळापत्रक जाहीर
2

IPL 2026 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा! Team India ‘या’ देशाच्या दौऱ्यावर; मालिकेचे वेळापत्रक जाहीर

खळबळजनक! इंडिगोच्या विमानातील शौचालयात ‘Danger’ लिहिलेला टिश्यू पेपर सापडला, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
3

खळबळजनक! इंडिगोच्या विमानातील शौचालयात ‘Danger’ लिहिलेला टिश्यू पेपर सापडला, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Medical education : वैद्यकीय शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव? अत्याधुनिक संकल्पनांचा समावेश अजूनही अपुरा
4

Medical education : वैद्यकीय शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव? अत्याधुनिक संकल्पनांचा समावेश अजूनही अपुरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.