फोटो सौजन्य - सोशल मीडिया
दिलीप बने : आयपीएल २०२५ – TATA IPL 2025 म्हणजे मनोरंजन आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेटचा उत्सव. पण इंडियन प्रीमियर लीग भारतीय सरकारला TDS च्या स्वरूपात किती टॅक्स देतो हे तुम्हाला माहिती आहे का? रक्कम ऐकलात नक्कीच विचारत पडाल. थोडं जाणून घेऊया की २०२३-२०२७ साठी ब्रॉडकास्टरने किती रक्कम मोजली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ब्रॉडकास्टींगच्या स्वरूपात किती रक्कम द्यावी लागते यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
लहानपणी आपल्याला कोणी विचारलं तू पुढे मोठा होऊन कोण होणार आहेस तर आपलं एकच उत्तर असायचं ते म्हणजे एक तर डॉक्टर नाही तर क्रिकेटर. यावेळी सचिन तेंडूलकर आपण सहज बोलून जायचो. पण आता तू क्रिकेटर का होशील असं जर लहान मुलांना विचारलं तर त्याचे उत्तर हमखास आयपीएल खेळायचं आहे असेच असेल. आपण पाहिलं असेल एक १३ वर्षाचा बालक आयपीएलमध्ये कोट्यवधीला त्याला विकत घेतले. आई- वडिलांना किती आनंद आणि प्राऊड फील झालं असेल. एवढ्या लहान वयात कोटींचा मालक होणे खायची गोष्ट नक्कीच नाही. तो मुलगा टैलेंटेड असणार ह्यात काही वाद नाही पण इतकी मोठी रक्कम जर मिळत असेल तर कोणी हि क्रिकेट खेळायचं आहे असेच म्हणेल. जिथे पैसे जास्त असतो तिकडेच लोकांचा ओढा असतो.
देशामध्ये त्याचबरोबर जगभरामध्ये अनेक स्पोर्ट्स इव्हेंट्स करताना काही बिझनेस कॅल्क्युलेशन नक्कीच असतात. ज्याचे वजन हजारो करोडोंच्या घरात असते. मग त्यात टीव्ही अधिकार आले, मीडियाचे अधिकार तसेच सरकारचा टॅक्स, मनोरंजन असे बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यात आल्या, यामुळेच आपल्याला हा आयपीएल इव्हेंट सहज बघता येतो आणि एन्जॉय करता येतो. आयपीएल इव्हेंट्सच ब्रॉडकास्टींगचे हक्क स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमाकडे आहेत त्यासाठी त्यांनी भलीमोठी रक्कम मोजली असेलच. त्याचबरोबर त्याची मार्केट किंमत पाहिलं तर ती 48,390 कोटींच्या घरात जाते. बीसीसीआय त्यातून 12,097 कोटी रुपये कमावते. आणि ती रक्कम बीसीसीआय आणि फ्रेंचाईज ५०-५० टक्के वाटली जाते. महत्वाचं म्हंणजे बीसीसीआय BCCI भारत सरकारला एकही रुपया टॅक्स देत नाही.
बीसीसीआय टॅक्स भरत नसेल तर सरकारला टॅक्स स्वरूपात एवढी मोठी रक्कम कोण देतो तर त्याच गणित सोप्प आहे. सरकार हे सगळे टॅक्स खेळाडूंच्या पगारातून रक्कम जमा करते स्वदेशी खेळाडू असतील तर त्यांचा कडून १०% TDS रक्कम कापून घेते, तसेच विदेशी खेळाडू असतील तर त्यांच्याकडून २०% TDS रक्कम कापून घेण्यात येते. २०२५ मध्ये जो TATA IPL २०२५ चा लिलाव झाला त्यात १० संघाने खेळाडूंवर सुमारे 639.15 कोटी रुपये खर्च केले. 120 भारतीय आणि 62 परदेशी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. सरकारने यावर्षी TATA IPL २०२५ मधून सुमारे ८९.४९ कोटींची रक्कम टॅक्सचा tAX स्वरूपात जमा केली आहे.