फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Abhigyan Kundu Century U19 Asia cup India vs Malaysia : भारत विरुद्ध मलेशिया यांच्यामध्ये सध्या आशिया कप अंडर 19 चा तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. भारताच्या संघाने झालेल्या दोन्ही सामन्यामध्ये विजय मिळवून सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. वैभव सुर्यवंशी याने भारतीय संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये शतक झळकावले होते. त्याने दुबईविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये 171 धावांची खेळी खेळली होती. तर आज सुरु असलेल्या सामन्यामध्ये देखील त्याने अर्धशतक झळकावले पण तो त्याची खेळी मोठी खेळण्यात अपयशी ठरला.
भारत विरुद्ध मलेशिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे हा आणखी एकदा फेल ठरला. भारताच्या संघाने दोन विकेच लवकर गमावल्यानंतर सुरुवातीला वैभव सुर्यवंशी याने भारतीय संघाचा खेळ सांभाळला त्यानंतर अभिज्ञान कुंडू आणि वेदांत त्रिवेदी यानी भारतीय संघासाठी कमालीची खेळी खेळत आहे. या दोन्ही फलंदाजांनी मलेशियाच्या गोलंदाजांना दबावात ठेवले आहे. या खेळमध्ये अभिज्ञान कुंडू याने शतकीय खेळी खेळली आहे. अभिज्ञान कुंडू याने 81 चेंडूमध्ये त्याचे शतक पुर्ण केले आहे.
Century for Abhigyan Kundu against Malaysia U-19 in Asia Cup 2025.#INDvsMAL #AsiaCup2025 #U19 pic.twitter.com/I2RSFZypPv — Mr. Cricket UAE (@mrcricketuae) December 16, 2025
अभिज्ञान कुंडूने केवळ डाव स्थिर ठेवला नाही तर धावगतीही कमी ठेवली. त्याने चौकारासह शतक पूर्ण केले आणि १२० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने शतक पूर्ण होईपर्यंत त्याच्या डावात ११ चौकार आणि एक षटकार मारला आणि वेदांत त्रिवेदीसह हुशारीने डाव पुढे नेला. वैभव सूर्यवंशीनंतर तो सध्या सुरू असलेल्या आशिया कपमध्ये शतक करणारा दुसरा भारतीय ठरला. त्याने युएईविरुद्ध नाबाद ३४ आणि पाकिस्तानविरुद्ध २२ धावा केल्या होत्या.
अभिज्ञान कुंडूचा जन्म ३० एप्रिल २००८ रोजी कोलकाता येथे झाला . वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्याने स्वतःला स्थापित केले आहे. तो वयाच्या आठव्या वर्षापासून क्रिकेट खेळत आहे . तो यापूर्वी मुंबईच्या १४ वर्षांखालील संघाकडून खेळला आहे. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आणि प्रेम आहे.






