फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आयपीएल २०२६ चा लिलाव काही तासांत होणार सुरु होणार आहे. कधीकधी, परदेशी खेळाडू लिलावात सहभागी होतात परंतु स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच माघार घेतात. गेल्या काही वर्षांत असे अनेक वेळा घडले आहे आणि यामुळे बीसीसीआयने एक नियम लागू केला आहे. खेळाडू आयपीएलमधून माघार घेऊ शकतात, परंतु त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. जर ते दुखापतीमुळे बाहेर पडले तर कोणतीही अडचण येणार नाही. तथापि, जर इतर कारणे असतील तर त्यांना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली जाऊ शकते.
इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात विकल्यानंतर परदेशी खेळाडू दुखापत झाल्यासच माघार घेऊ शकतो. यासाठी त्याच्या घरच्या बोर्डाकडून दुखापतीची पुष्टी देखील आवश्यक आहे. इतर कोणत्याही कारणास्तव माघार घेतल्यास आयपीएलमध्ये सहभागी होण्यास दोन वर्षांची बंदी घातली जाईल. मेगा लिलावासाठी नोंदणी न केलेल्या खेळाडूंना २०२६ च्या आयपीएल मिनी लिलावात आधीच प्रवेश करता येणार नाही. चाहत्यांचा असाही विश्वास आहे की बीसीसीआयने नियम कडक करून योग्य निर्णय घेतला आहे.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावामध्ये असे इंग्लिश खेळाडू हॅरी ब्रुक याने केले होते. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली होती. यावेळी मेगा लिलाव नाही पण मिनी लिलावामध्ये देखील हाच नियम लागू होतो.
कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ६४.३
चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) ४३.४
सनरायझर्स हैदराबाद (एसएलआर) २५.५
लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) २२.९५
दिल्ली कॅपिटल्स (डीसी) २१.८
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) १६.४
राजस्थान रॉयल्स (आरआर) १६.०५
गुजरात टायटन्स (जीटी) १२.९
पंजाब किंग्ज (पीबीकेएस) ११.५
मुंबई इंडियन्स (एमआय) २.७५
आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव आज अबू धाबी येथील एतिहाद अरेना येथे होणार आहे. दहा संघ एकूण ३६९ खेळाडूंसाठी बोली लावतील. या वर्षीच्या लिलावात अनेक प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे, ज्यामुळे हा लिलाव खूपच मनोरंजक बनला आहे. गेल्या लिलावात २३.७५ कोटी रुपये मिळवणारे वेंकटेश अय्यर पुन्हा एकदा अनेक संघांच्या यादीत अव्वल स्थानावर असतील. लियाम लिव्हिंगस्टोन, कॅमेरॉन ग्रीन आणि डेव्हिड मिलर यांनाही मोठ्या बोली लागण्याची अपेक्षा आहे.
तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव पाहू शकता. तुम्ही जिओहॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रीमिंग देखील पाहू शकता. लिलाव दुपारी २:३० वाजता सुरू होईल.






