PBKS Vs LSG Live Streaming (फोटो- सोशल मिडिया)
पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सामना होणार
प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबला विजय अनिवार्य
आरसीबी अन् गुजरातमध्ये क्वालिफायर 1 चा सामना
Tata IPL 2026 PBKS VS LSG Toss Live Updates: थोड्याच वेळात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील महत्वाचा सामना होणार आहे. पंजाब किंग्जसाठी आजचा सामना अत्यंत महत्वचा असणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे प्लेऑफमध्ये जणीसाठी पंजाबच्या संघाला आजचा सामना जिंकणे (IPL 2026) महत्वाचे असणार आहे. दरम्यान पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाब किंग्जने आयपीएलची सुरुवात शानदार केली होती. मात्र सध्या पंजाबने सलग सामने गमावले आहेत. त्यामुळे प्ले ऑफचा त्यांचा प्रवास खडतर झाला आहे. श्रेयस अय्यर पंजाबचे नेतृत्व करत आहे. तर ऋषभ पंत लखनौची धुरा सांभाळत आहे. पंजाबकडून श्रेयस अय्यर, प्रभसिमरन सिंग आणि युझवेंद्र चहल आणि कूपर कॉनली हे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मात्र त्यांना पंजाबला विजय मिळवून देता आलेला नाही.
तर दुसरीकडे लखनौचा संघ कधीच प्ले ऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. शेवटच्या स्थानावर असलेल्या लखनौच्या संघाचा आजचा शेवटचा साखळी सामना असणार आहे. त्यामुळे स्पर्धेचा शेवट चांगला करण्यासाठी लखनौचा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. साखळी सामन्यातील पहिल्या सामन्यात पंजाबने लखनौला पराभूत केले होते. त्यामुळे आज लखनौचा संघ बदला घेऊन पंजाबची प्ले ऑफची वाट खडतर करण्यासाठी सज्ज असणार आहे.
लखनौ विरुद्ध पंजाब सामना ईकाना स्टेडियममधील खेळपट्टी क्रमांक ५ वर खेळला जाईल. ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकते. यपीएल २०२६ मध्ये या मैदानावर खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांपैकी, पाठलाग करणाऱ्या संघाने तीन सामने जिंकले तर २प्रथण फंलदाजी करणाऱ्या संघाने जिंकले. आयपीएल २०२६ मध्ये इतर मैदानाच्या तुलनेत ईकाना स्टेडियवर सर्वात कमी धावसंख्या पाहायला मिळाली. येथे स्फोटक फलंदाजीपेक्षा गोलंदाजी अधिक फायदेशीर ठरते. म्हणून नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ शकतो. येथे तापमान ३५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून, पावसाचा कोणताही अंदाज नाही.
पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर) कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग.
IPL 2026: Qualifier-1मध्ये RCB vs GT; फायनलचे तिकीट कोणाला? हैदराबाद अद्याप वेटिंगवर
लखनौ सुपर जायंट्स : मिचेल मार्श, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर) अब्दुल समद, आयुष बडोनी, शाहबाज अहमद, मोहसीन खान, मयंक यादव, आकाश सिंग, प्रिन्स यादव






