फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्याचा अहवाल : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना संपला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताच्या संघाला १८४ धावांनी पराभूत केलं आहे आणि या मालिकेमध्ये २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या संघाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्याच्या आशा संपुष्टात होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारताच्या संघाने फलंदाजी खराब सुरुवात केल्यामुळे टीम इंडियाचे पराभवाचे हे एक कारण आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने सुरुवात दमदार करून पहिल्या इनिंगमध्ये मजबूत फलंदाजी केली आणि संघासाठी ४७४ धावा केल्या होत्या.
#TeamIndia fought hard
Australia win the match
Scorecard ▶️ https://t.co/njfhCncRdL#AUSvIND pic.twitter.com/n0W1symPkM
— BCCI (@BCCI) December 30, 2024
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाजांनी कमालीची कामगिरी करत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर सॅम कॉन्स्टास (६०), उस्मान ख्वाजा ()५७, मार्नस लॅबुशेन (७२) या फलंदाजांनी पहिल्या डावात अर्धशतक ठोकले होते. तर स्टीव्ह स्मिथने त्याचे ऐतिहासिक शतक झळकावले. स्टीव्ह स्मिथने संघासाठी १४० धावांची खेळी खेळली होती.
भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर फलंदाजीमध्ये नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनीच चांगली कामगिरी केली. पहिल्या डावांमध्ये भारताच्या संघाने ३६९ धावा केल्या होत्या, यामध्ये नितीश कुमार रेड्डीने त्याच्या करियरचे पहिले शतक ठोकले होते. रेड्डीने ११४ धावांची खेळी खेळली होती. तर वॉशिंग्टन सुंदर ५० धावा करून अर्धशतक ठोकले होते. गोलंदाजीबद्दल सांगायचं झालं तर जसप्रीत बुमराहने संघासाठी चार विकेट्स घेतले होते तर ३ विकेट्स रवींद्र जडेजाने नावावर केले होते. त्याचबरोबर आकाशदीपने संघासाठी २ विकेट्स घेतले आणि वॉशिंग्टन सुंदर १ विकेट घेतला होता.
IND vs AUS : यशस्वी जैस्वालचा झेल ठरला वादग्रस्त, सुनील गावस्कर म्हणाले- टेक्नोलॉजी वापरू नका…
दुसऱ्या डावाची वेळ आली तेव्हा कांगारू संघाने २३४ धावा केल्या, त्यामुळे चौथ्या डावात भारताला ३४० धावांचे मोठे लक्ष्य मिळाले. भारताकडून यशस्वी जैस्वालने दोन्ही डावात अर्धशतक झळकावले. पहिल्या डावात ८६ धावांवर तो धावबाद झाला. दुसऱ्या डावात त्याने एकट्याने २०८ चेंडू खेळले, ज्यात त्याने ८४ धावा केल्या. त्याची विकेटही वादग्रस्त ठरली कारण एकीकडे स्निकोमीटरमध्ये एकही स्पाइक दिसत नव्हता, दुसरीकडे जैस्वालच्या बॅट आणि ग्लोव्हजवळून चेंडू गेल्यावर त्याची दिशा थोडी बदलली. याच आधारावर तिसऱ्या पंचांनी जयस्वालला बाद केले. जयस्वाल बाद झाल्यानंतर १५ धावांच्या आत भारताचे इतर फलंदाजही बाद झाले.
मालिकेतील दुसऱ्या, तिसऱ्या आणि आता चौथ्या सामन्यादरम्यान रोहित शर्माच्या खराब कर्णधारावर टीका झाली. रोहितची वैयक्तिक कामगिरीही निरुपयोगी ठरली कारण त्याने दोन्ही डावांत मिळून केवळ १२ धावा केल्या.