वेस्ट इंडिज वि भारतीय संघ(फोटो-सोशल मीडिया)
Indian squad for Test series against West Indies : आशिया कप नंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन हात करणार आहे. या दोन संघामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेसाठी लवकरच भारतीय संघ जाहीर करण्यात येणार आहे. रविवारी बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी माध्यमांना माहिती देताना संगीतेल की, आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ पुढील दोन ते तीन दिवसांत घोषित करण्यात येणार आहे.
हेही वाचा : Asia cup 2025: पावसाच्या हजेरीने IND vs PAK सामना रद्द झाला तर काय? कोणाची लागेल लॉटरी? जाणून घ्या
सैकिया यांनी रविवारी बीसीसीआय मुख्यालयात पत्रकारांसोबत संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितले की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची निवड २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. निवड बैठक ऑनलाइन होणार आहे. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. जिथे नवीन अध्यक्षाचे नाव देखील अंतिम करण्यात येणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. यातील पहिला कसोटी सामना २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे तर दुसरा कसोटी सामना १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्ली येथे खेळवण्यात येणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेतील ही पहिली घरची मालिका असणार आहे. या वर्षी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यापूर्वी गिल भारताचा ३९ वा कसोटी कर्णधार बनला आहे.
युवा कर्णधार शुमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले आहे. या मालिकेत शुभमन गिलने ७०० हून अधिक धावा फटकावल्या होत्या. तर भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने २३ विकेट्स गेहून सर्वांना प्रभावित केले होते. भारताला घरच्या मैदानावर विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी असणार आहे.
वेस्ट इंडिकडून संघ जाहीर
जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५-२७ च्या चक्रातील वेस्ट इंडिजचा भारता विरुद्धचा पहिलाच परदेश दौरा असणार आहे. रोस्टन चेसच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघ घोषित करण्यात आला आहे, तर जोमेल वॉरिकन त्यांचा उपकर्णधार असणार आहे. ३३ वर्षीय अष्टपैलू खेळाडू खारी पियरेचा पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच संघात तेगनारायण चंद्रपॉल आणि अॅलिक अथानासे यांचेही पुनरागमन झाले आहे.
रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन (उपकर्णधार), केवलन अँडरसन, अॅलिक अथानासे, जॉन कॅम्पबेल, तेगनारायण चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्हज, शाई होप (यष्टीरक्षक), टेविन इमलाच, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खारी पियरे, जेडेन सील्स.